आंबेगाव, दि.१७ : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील पाटण खोऱ्यामध्ये डॉ.शेखर बेंद्रे आरोग्य केंद्र म्हाळुंगे यांच्यावतीने दर रविवारी मोफत आरोग्य सेवा दिली जाते. नुकतेच दि.१७ रोजी या ठिकाणी मोफत नेत्रतपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात एकून ६० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या रुग्णांची तपासणी पुणे येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञडॉ.बबन डोळस, डॉ.संजय कसबे यांनी केले तर optometrist म्हणून शरद तेलप यांनी उपस्थित राहून आपली सेवा दिली.
या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी डॉ.बबन डोळस यांनी आपल्या डोळ्यांची आपण कशी काळजी घ्यावी, याविषयी माहिती दिली व नुकत्याच झालेल्या जागतिक दृष्टी दिनाचे औचित्य साधत हा कार्यक्रम पार पडत असल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. पाहुण्यांचे स्वागत अशोक जोशी, कृष्णा वडेकर, हिरा पारधी यांनी केले. यावेळी नेत्र तपासणीत १५ मोतीबिंदूचे रुग्ण समोर आले तर तिरळेपणाचे २ रुग्ण आढळले.
लवकरच मोतीबिंदूचे रुग्ण यांची पुणे येथील पिंपळे सौदागर येथील ग्लोबल आय इन्स्टिटयूट मध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. तसेच २८ रुग्णांना चष्म्याची आवश्यकता होती, त्यांनाही मोफत चष्मे देण्यात येईल, अशी माहिती ग्लोबल आय इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बबन डोळस यांनी दिली.
मोतिबिंदूचे ऑपरेशन व चष्मे यांचा सर्व आर्थिक भार ग्लोबल आय इन्स्टिट्यूट करणार आहे. या शिबीराचे स्थानिक संयोजन अशोक जोशी, अशोक पेकारी, अजय पारधी, हिरा पारधी, कृष्णा वडेकर, सुनील पेकारी, लक्ष्मण मावळे यांनी केले.