आंबेगाव : शासकीय निधीचा अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील जांभोरी या गावात मागील ४ ते 5 महिन्यांपासून समुदाय वैद्यकीय अधिकारी (C.H.O.) या उपस्थित राहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या अगोदरही या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने किसान सभेने तक्रार अर्ज तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केला होता. यावेळी, वरिष्ठ अधिकारी यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना समज देऊन उपस्थित राहण्याविषयी सूचित केले होते. यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी आठवडाभर उपस्थित राहून पुन्हा गैरहजर राहू लागल्या आहेत.
विशेष लेख : वन निवासींवरील अन्याय थांबवा ! – डॉ. अजित नवले
संबंधीत समुदाय वैद्यकीय अधिकारी या, मागील चार ते पाच महिने उपस्थित नसताना ही त्यांना त्यांचे वेतन मिळत आहे का? असा सवाल किसान सभेने केला आहे, व जर मानधन मिळत असल्यास हा शासनाच्या निधीचा अपहार आहे. कामावर गैरहजर असताना वेतन घेणारे व वेतन मंजूर करणारे अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.
लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ग्रामस्थांशी आम्ही चर्चा व चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल.
– सुरेश ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी, आंबेगाव
समुदाय आरोग्य अधिकारी यांनी सकाळी ८:३० ते १२:३० या दरम्यान (सोमवार ते शुक्रवार) ओपीडी करावी व यानंतर १:३० ते ५:०० या दरम्यान फिरती ओपीडी करावी. असे अपेक्षित असताना सदरील वैद्यकीय अधिकारी या कोणतेही काम न करता निव्वळ वेतन घेऊन शासनाची व आदिवासी जनतेची फसवणूक करत आहे. हा अत्यंत गंभीर व संतापजनक प्रकार आहे.
हेही वाचा ! नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९२५ जागा
काम न करता वेतन घेणाऱ्या व वेतन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासकीय निधीचा अपहार म्हणुन गुन्हा दाखल करावा व संबंधित प्राथमिक उपकेंद्रात नियमीत आरोग्य सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय समुदाय अधिकारी यांची नेमणूक करावी अशी संघटनेनी मागणी करण्यात आली आहे.
काम न करता वेतन घेणाऱ्या व देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास किसान सभेच्या वतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जांभोरी येथे, कोविडची परिस्थिती लक्षात घेता, मर्यादित लोक उपोषण करतील असा इशाराही किसान सभेचे अशोक पेकारी, सुभाष भोकटे, दत्ता गिरंगे, देविका भोकटे, दिलीप काठे, जिजाबाई केंगले, मोहन लोहकरे, विशाल गिरंगे यांनी दिला आहे.
हेही वाचा ! ओडिशात आदिवासींवर कंपनी – सरकार चे जुलमी राज्य – डॉ. संजय दाभाडे
बंपर भरती ! ESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती
हेही वाचा ! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा