Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याAmaravati : बाबासाहेबांच्या कमानीचा वाद चिघळला, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

Amaravati : बाबासाहेबांच्या कमानीचा वाद चिघळला, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज

Amaravati : अमरावतीमधून (Amravati ) एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या खानापूर पांढरी मध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे. काही दिवसांपासून पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र आज हा वाद चिघळला. (Amaravati)

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार लावण्यावरून वाद सुरू आहे. यासाठी चार दिवसांपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु होते. गावात संचारबंदी लावण्यात आली आहे, पण तरीही पांढरी खानापूर येथील ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील विविध भागातून मोठा जमाव विभागीय आयुक्तालयावर धडकला.

या आंदोलना दरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये राडा झाला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्यावेळी पोलिसांनी जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या.

पांढरी खानापूर गावातील प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणीसाठी ग्रामस्थांकडून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे, मात्र, प्रशासन अंतिम निर्णय घेत नसल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : देशात CAA’नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू

इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान

मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा

जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’

संबंधित लेख

लोकप्रिय