Saturday, October 5, 2024
Homeविशेष लेखAluvadi : दलदलीच्या पाणथळ भागात उगवणाऱ्या अळूची रंजक माहिती

Aluvadi : दलदलीच्या पाणथळ भागात उगवणाऱ्या अळूची रंजक माहिती

अळू कुठेही उगवतो. तरीही अळू पाहिले, की अनेक जण नाक मुरडतात. अळूबद्दल अजूनही कुणाला फारशी शास्त्रीय माहिती नाही. अळूची कोणी शेती करीत नाहीत. तो स्वस्त असूनही बाजारात कोणी फारसे विकत घेत नाहीत. श्रावणात तो आहारात वापरला जातो. वर्षभर अळू उगवत असतो. हा अळू पाणथळ जागी मिळतो. ज्यांना अळूचे महत्त्‍व माहिती आहे, ते मात्र चवीने खातात. पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा औषधी अळूचा आहारात वापर करावा. (Aluvadi)

महाराष्ट्रात लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबऱ्याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजरातमध्ये पात्रा म्हणतात.

उपवासाच्या दिवशी अळूचे कंद उकडून खातात. या कंदांना अळकुडी असे नांव आहे. गुजराथीत आरवी असे म्हणतात. भाजीचा अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन मुख्य प्रकार आहेत. अळूच्या पानाच्या मधोमधून पिवळे फुल येते. (Aluvadi)

अळूच्या देठापासून “देठी” हा पदार्थ बनवला जातो. अळूचे देठ सोलून त्याचे लहान तुकडे करावे. ते कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. त्यानंतर ते थंड झाल्यावर हाताने कुस्करावे.त्यात गुळ,कांदा बारीक चिरून, हळद, मीठ, तिखट व दही घालावे. नंतर सर्व मिश्रण एकजीव करून वाढावे. हा पदार्थ जेवणापूर्वी खूप आधी करून ठेवू नये.


पावसाळी भाजी …अळू

कोकणात प्रत्येकाच्या आगरात अळू , केळी आणि कर्दळी असतातच. उन्हाळयात पाण्याच्या कमतरतेमुळे जरा कोमेजल्या तरी तग धरून असतात. पावसाला सुरुवात झाली की मात्र भरपूर पाण्यामुळे अगदी तरारून येतात. केळी साठी नाही पण अळू आणि कर्दळी साठी “ माजणे “ हा खास शब्दप्रयोग ही वापरात आहे. (Aluvadi)

पावसाळ्यात अळू अक्षरशः फोफावत, त्याची पान ही अगदी हत्तीच्या काना एव्हडी मोठी होतात. देठी चांगली जाडजूड होते.अळूवाचा दळा इतका भरगच्च होतो की भाजीसाठी अळू कापायला जाताना ही किरडू मारडू निघेल, की काय अशी भीती वाटते. शहरात मिळत तस तळहाता एवढ्या पानांचं आणि सुतळी सारख्या देठांचं अळू खर तर घेववत ही नाही. इकडे शहरात मिळतं तस वडीचं किंवा भाजीचं असं सेपरेट अळू नसतं कोकणात आमच्याकडे. पांढऱ्या देठाचं आणि कमी डार्क पानांचंच अळू असत आमचं आणि आम्ही त्याच्याच वड्या आणि पात्तळ भाजी असं दोन्ही करतो.

कलोकेशिया एस्क्युलेंटा ; इंग्लिश: Taro, टॅरो) ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. मुळात आग्नेय आशियातली ही वनस्पती आता आफ्रिका व आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वत्र आढळते. अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते. मराठवाड्यात अळूला ‘चमकोरा /चमकुरा’ असे पण म्हणतात.

अळूचे मूळ

अळू मूळ आग्नेय आशियातील, नंतर पॅसिफिक महासागरी बेटांवरही प्रसार, अळूच्या कंदाला ‘आर्वी’ म्हणतात

अळूचे पदार्थ

महाराष्ट्रात अळूवडी, फतफते केरळात चेंबिला करी
गुजरातमध्ये पात्रा, कोळंबी वापरून केलेली तिखट अळूवडी, कोथिंबीर वडीप्रमाणे बारीक चिरलेल्या अळूची वडी, नारळाच्या दुधातील अळूवडी
कर्नाटकच्या दक्षिण उडुपी भागात पात्रोडे म्हणतात. (Aluvadi)

अळूच्या पानांचा महिन्यातून दोनदा ते तीनदा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. A, B6 आणि C जीवनसत्वे यामध्ये खूप प्रमाणात असतात. तुमचे जर युरिक एसिड(Uric Acid) वाढलेले असेल, गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची तक्रार असेल तर अळू खाणे टाळावे.

****

***

संबंधित लेख

लोकप्रिय