जुन्नर (पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही गावोगावी मोठ्या प्रमाणात खासदार अमोल कोल्हे यांनी कामे मंजूर करून दिली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात पण खूप काही इतिहास कालीन गडकिल्ले आहेत, याच्याकडे ही लक्ष्य देणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहर भोसरी विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष संतोष मारुती बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
संतोष बोऱ्हाडे म्हणाले की, निवडणूक आल्यावर सर्वच पुढारी आदिवासी भागात दौरे करतात. निवडून आल्यानंतर ५ वर्षे आमचा आदिवासी समाज काय करतोय याच्या कडे कोणत्याही राजकीय नेत्यांचे लक्ष्य नसते. हे आतापर्यंत खूप आदिवासी समाजाने सहन केले आहे, पण आता हे खपवून घेतले जाणारर नाही. आदिवासी भागाचा ही विकास झाला पाहिजे.
आदिवासी समाजाचा फक्त मतदानासाठी वापर होत आहे हे आता सहन न करता लढायला पाहिजे, असेही ते म्हणाले.