अकोला : वानर म्हणलं की आपल्याला आठवतं शेतीचे फळझाडांचे नासधुस करणारा प्राणी.पण शिस्तबद्ध पद्धतीने रांगेमध्ये जेवण करणारी वानरे आपण पाहिलेत का नसेल तर हा व्हिडिओ पहा.
अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र अवगया कोथळी बु.येथे संस्थानच्या वतीने अभिनव पद्धतीने हुनुमान जयंती साजरी करण्यात आली. माणसांबरोबरच चक्क माकडांना सुद्धा जेवणाच्या पंगतीमध्ये स्थान देण्यात आले. हनुमान जयंतीचे महाप्रसाद वानरांनी कोणतेही चाळे न करता शिस्तीत खाल्ला.
विशेष म्हणजे नेहमी खट्याळ वागणाऱ्या वानरांनीसुध्दा माणसाला लाजवेल असे एका रांगेत बसून जेवणाचा आस्वाद घेतला. या आगळयावेगळया पंगतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत शेकडो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
संस्थानचे पुजारी रामदास महाराज यांनी सदर महाप्रसादाचे वाटप वानरसेनेला केले. या पंगतीची चर्चा राज्यात होत असून, लोक सदर संस्थांनचे कौतुकदेखील करत आहेत.