Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

MPSC च्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या ! राज्य सरकारचा मोठा निर्णय.

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

---Advertisement---

मुंबई : कोरोनाच्या बदल्या परिस्थितीमुळे स्पर्धा परिक्षांवर परिणाम झालेला असून MPSC च्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे . ‘कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल’, असं ट्वीट करण्यात आलं आहे.

---Advertisement---

 या आधी देखील राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. शेवटी २० सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

एप्रिल महिन्यात ४ तारखेला MPSC ची परीक्षा होणार होती. मात्र, कोरोनामुळे ती पुढे ढकलून २६ एप्रिल करण्यात आली. पण कोरोनाचं संकट वाढल्यामुळे २६ एप्रिलची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. अनिश्चित काळासाठी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर १७ जून रोजी राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. पण त्यानंतर पुन्हा एकदा त्या पुढे ढकलण्यात आल्या.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles