भूम : आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, (एआयएसएफ) भूम तालुका कौन्सिलच्या वतीने आज नवे शैक्षणिक धोरण 2020 च्या ड्रॉफ्टची राष्ट्रपतींना निवेदन पाठवून होळी करण्यात आली. सर्वांना मोफत, समान, सक्तीचे शिक्षण द्या अशी मागणी करण्यात आली. हे होळी आॅल इंडिया स्टुडंन्टस् फेडरेशनच्या (एआयएसएफ) ईट येथील कार्यालयाच्या समोर करण्यात आले.
“एआयएसएफ” चे म्हणणे आहे की, नव्या शैक्षणिक धोरण चांगले आहे तर संसदेत न मांडता, चर्चा न करता त्याची अधिसूचना का काढली, हे शैक्षणिक धोरण संविधानातील मूल्य विरोधी, शिक्षणाचे केंद्रीकरण, व्यापारीकरण, धार्मिकीकरण करणारे असे आहे, ते जनतेवर लादले आहे. हे धोरण प्रसारमाध्यमांद्वारे जबरदस्तीने पोहचवले जात आहे, स्वायत्ततेच्या नावाने शाळा, कॉलेजचे अनुदान बंद होईल, विद्यापीठ अनुदान आयोग सारख्या नियंत्रण संस्था बंद होतील, एम. फिल. कोर्स बंद केल्याने संशोधनावर गंभीर परिणाम होईल, विद्यापीठाची स्वायत्ता संपेल, विद्यापीठांमधून ऑनलाइन शिक्षण देण्यामुळे गरीब वंचितांना शिक्षणातून बेदखल केले जाईल, त्यातून खाजगीकरण शिक्षणाचे बाजारीकरण होवून शुल्क वाढ होईल तसेच अनुदान बंद करण्यासाठी शैक्षणिक कर्ज योजना आणली जात आहे असे ‘आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन’ (एआयएसएफ) ने म्हंटले आहे. तसेच शिक्षण मोफत करावे अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली आहे.
यावेळी, ए.आय.एस.एफ. चे जिल्हा उपाध्यक्ष काॅ. अशोक माने, शहराध्यक्ष कॉ. विशाल माळी, शाखा सचिव कॉ. प्रेम भागवत, कॉ. मयूर पवार, कॉ. बाळासाहेब हुंबे, कॉ. सुरज वेदपाठक आदी पदाधिकारी उपस्थित होते.