Thursday, July 18, 2024
Homeबॉलिवूडआलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत, Durex ने केली मजेदार पोस्ट...

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत, Durex ने केली मजेदार पोस्ट शेअर !

 

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला मुंबईमध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर लगेचच आलियानं या विवाहसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली. आलियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या रोमँटिक फोटोंवर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रेटींनी देखील कमेंट करत या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चांगली बातमी : यंदा पावसाळा सामान्य, सरासरी पर्जन्यमान ‘इतके’ असेल

एवढंच नाही तर कंडोम ब्रँड ड्युरेक्सनं देखील एक मजेदार पोस्ट करत आलिया आणि रणबीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना सोनम कपूर, जेनेलिया डिसूजा, माधुरी दीक्षित, टाइगर श्रॉफ, तमन्ना भाटिया, जान्हवी कपूर, अनिल कपूर, सोनू सूद, दीया मिर्जा, मौनी रॉय, मनीष मल्होत्रा यासांरख्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पण सर्वाधिक चर्चेत राहिली ती ड्युरेक्स ब्रँडची सोशल मीडिया पोस्टची.

LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ प्लानमध्ये केवळ 73 रुपये जमा केल्यावर मिळतील 10 लाख रुपये

ड्युरेक्सनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी रणबीर कपूरचं लोकप्रिय गाणं ‘चन्ना मेरेया’चा रेफरन्स देत मजेदार मेसेज लिहिला आहे. त्यांनी लिहिलं, ‘डियर रणबीर आणि आलिया, महफिल में तेरी हम ना रहे जो, फन तो नहीं है.’ त्यांचं ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सच्या मजेदार कमेंट पाहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Durex India (@durex.india)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय