लॉज व हॉटेल मालकांना पोलिसांची समज (ALANDI)
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी पुणे रस्त्यावरील वाढते हॉटेल – लॉज आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला परिसरात दिसत असल्याने नागरिकांतून मोठी नाराजी आहे. (ALANDI)
अवैध व्यवसाय करत असल्याचे परिसरात आढळून आल्यास संबंधित हॉटेल, लॉजचे मालक, चालक, व्यवस्थापक तसेच या संदर्भात जे जे संबंधित दिसतील त्या सर्वावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देत कठोर कारवाईचे सूचना निर्देश पिंपरी पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ तीनचे उपायुक्त ( डीसीपी ) डॉ. शिवाजी पवार यांनी बैठकीत दिले.
आळंदी पुणे रस्त्यावरील दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लॉज व हॉटेल मालक, चालक, व्यवस्थापक यांची बैठक पिंपरी पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ तीनचे उपायुक्त ( डीसीपी ) डॉ. शिवाजी पवार यांनी घेतली.
या बैठकीस दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक जाधव, अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीत हद्दीतील लॉज, हॉटेल व्यावसायिक देखील उपस्थिती होते. या बैठकीत परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा देण्यात आला. आळंदी परिसराचे पावित्र्य जोपासण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.
लॉज व हॉटेल मालक, चालक, व्यवस्थापक यांची यावेळी उपस्थिती होती. या बैठकी मुळे परिसरात हॉटेल, लॉज चालक, मालक, व्यवस्थापकाचे धाबे दणाणले असून या बैठकीची अनेकांनी धास्ती घेतली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांनी या बैठकीचे आयोजन करीत बैठकीत आढळून येणाऱ्या संबंधित दोषींवर किशोर कारवाई केली जाईल असे सांगितले.
हेही वाचा :
संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग
ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती