Thursday, May 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ALANDI : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांचे हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सुवर्ण महोत्सवी वर्ष (ALANDI)

आळंदी / अर्जुन मेदनकर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे रचीयाता आहेत. सन २०२४ – २५ हे  माऊलींचे ७५० वे वर्ष असून आळंदी देवस्थाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवाचे सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (७५०) २०२४-२५ साजरे करणार आहे. (ALANDI)

या निमित्त सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (७५०) २०२४ – २५ बोधचिन्ह तयार केले असून या बोधचिन्हाचे अनावरण राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांचे हस्ते राजभवन, मुंबई येथे झाले.  

  यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचे आळंदी देवस्थानचे वतीने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त श्री योगी निरंजन नाथसाहेब, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उमेश बागडे उपस्थित होते.

  राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनास येण्याची इच्छा व्यक्त करत लवकरच दर्शनास दौरा होणार आहे. प्रमुख विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब  यांनी संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांना दिली.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

---Advertisement---

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles