Monday, June 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Alandi : पुणे आळंदी पालखी मार्ग मॅग्झीन चौकात पोलीस प्रशासना तर्फे पाहणी

आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे तयारीचा आढावा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी, पदाधिकारी, संबंधित यंत्रणेतील कर्मचारी यांनी पुणे आळंदी पालखी महामार्ग मॅग्झीन चौकात प्रशासना तर्फे पाहणी करीत संबंधित यंत्रणेस सूचना करीत कामाचा आढावा घेतला. (Alandi)

यावेळी पाहणी पथकात पिंपरी चिंचवड पालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, परिमंडळ तीनचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूसाहेब ढेरे, ई प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त राजेश आगळे, माहिती विभागाचे आण्णा बोदडे, सह शहर अभियंता देवआण्णा गुट्टवार, ई-प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे,पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया अध्यक्ष अध्यक्ष रवींद्र जाधव, बाळासाहेब मोळक, सचिन तापकीर, सचिन गिलबिले, शांताराम आप्पा तापकीर, मनोज गायकवाड, सतोष वाळके, चन्होली ग्रामस्थ, मंडपवाले, कार्यकर्ते उपस्थित होते. (Alandi)

यावेळी पाहणीत फराळ, अन्नवाटप, स्वागत स्टेजच्या उंची, मार्गदर्शन, रस्त्यावर स्वच्छता राहील याची काळजी घेणे या बाबत सूचना देण्यात आल्या. फराळ, अन्नदान वाटपा नंतर कचरा साचला जाणार नाही, रस्त्यावर घाण होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्याशिवाय फराळ आणि अन्न वाटपासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाची उंची अडीच ते तीन फुटां पेक्षा जास्त असू नये अशा मार्गदर्शक सूचना यावेळी अधिकारी यांनी पाहणीत दिल्या. यावेळी ग्रामस्थ आणि संबंधित कामांचे कर्मचारी यांनी हि प्रशासनाशी संवाद साधत कामां बाबत माहिती दिली. (Alandi)

संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमात बंदोबस्त, आणि श्रमदान सेवा दिल्या बदल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था यांचे सेवक, साधक, पोलीस मित्र यांचा पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ़ इंडिया तर्फे सम्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी अध्यक्ष रवींद्र जाधव, उपाध्यक्ष वैभव हनुमंत, अर्जुन मेदनकर, मयुर गिल आदी उपस्थित होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles