आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी पोलीस स्टेशन चे वतीने वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शक सूचनादेशा प्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ ३ चे चाकण विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक बी. एस. नरके यांचे प्रमुख उपस्थितीत शांततेसाठी रूट मार्च काढून संचलन केले. (Alandi)
यावेळी आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत आळंदी आणि चिंबळी गावात रूटमार्च झाला. यावेळी पोलीस कर्मचारी वृंद उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे तारखा जाहीर करून राज्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणूक शांततामय आणि निर्भय वातावरणात व्हावी. राज्यात मतदारांनी कोणत्याही धमक्या व अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क वापरावा.
यासाठी आळंदी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रा तील तीर्थक्षेत्र आळंदीत मुख्य नगरप्रदक्षिणा मार्गावरून तसेच शहरात विविधी मार्गावरून आळंदी पोलिसांनी संचलन करीत आळंदीसह चिंबळी येथेही रूट मार्च काढला. समाज कंटकांना यातून दहशत मिळून निवडणुका निर्भय वातावरणात होण्यास मदत होणार आहे. (Alandi)
येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.
आळंदीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभाग, स्थानिक पोलिस स्टेशनच्या वतीने संचलन उत्साहात करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ ३चे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर, आळंदी पोलिस स्टेशनचे निरीक्षक भिमा नरके, पोलिस नाईक मच्छीद्र शेंडे यांचेसह पोलीस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत आळंदीसह चिंबळीत रूटमार्च मार्ग आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने दोन ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला. यामध्ये आळंदी शहरातुन सकाळी एक तास रूटमार्च झाला. यावेळी पोलीस स्टेशन – नगर परिषद चौक- महाद्वार चौक – पितळी गणपती – घुंडरे आळी चौक – चाकण चौक – केळगाव चौक – वडगाव चौक – पद्मावती झोपडपट्टी – ४० फुटी रोड – मरकळ चौक – जलाराम मंदिर चौक – दत्तमंदिर – विठ्ठल रुक्मिणी चौक असा रूट मार्च उत्साहात झाला. तसेच दुस-या ठिकाणचे चिंबळी गावातुन सकाळी दहा वाजता रूटमार्च घेण्यात आला. यात भैरवनाथ मंदिर चौक – बौद्ध विहार – आळंदी रोड – मुख्य चौक – चिंबळी फाटा रस्ता येथून भैरवनाथ मंदिर चौक या मार्गावर रूट मार्च घेण्यात आला. आळंदी पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चार एपीआय, पीएसआय, ४२ अंमलदार, डेल्टा ४७ बीएसएफ प्लाटून, ५ अधिकारी, ६० जवान, सीआयएसएफचे १ अधिकारी आणि ४० जवान या रूटमार्च मध्ये सहभागी झाले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके यांनी परिश्रम घेतले.