Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ALANDI : पालखी प्रस्थान सोहळा नियोजन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांचा दौरा

अलंकापुरीत नागरिकांसह भाविकांना सेवा सुविधाना प्राधान्य देण्याचे आदेश ALANDI

ALANDI / अर्जुन मेदनकर : आषाढी वारी निमित्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आळंदीत प्रशासकीय अधिकारी, पालखी सोहळ्याचे संबंधित पदाधिकारी यांच्या समवेत आळंदी येथील दर्शनबारी जागा, भक्ती सोपान पुल, स्कायवॉक, नदी पात्रातील जलपर्णी, प्रदक्षिणा मार्ग यांची पाहणी करून सर्व प्रशासकीय यंत्रणाना यात्रा काळात भाविक, नागरिक यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्राधान्य देण्याचे सूचनादेश पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Divase) यांनी अधिकारी, कर्मचारी तसेच पालखी सोहळ्यातील संबंधित यांना दिले. (A Review of Ashadhi Yatra Preparations)

या पाहणी दौऱ्या प्रसंगी पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, खेड तहसीलदार प्रशांत बेडसे, हवेली प्रांत आसवले, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पा., नगरपरिषदेचे विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. ALANDI

या पाहणी दौ-यात पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांना उपस्थितांनी विविध सेवा सुविधांची मागणी केली. या मागण्या बाबत सुसंवादः साधत पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांनी दरवर्षी प्रमाणे दर्शन बारीची जागा वारी कालावधीत प्रशासनाच्या ताब्यात घेण्याचे आदेश लवकरात लवकर निर्गमित करण्याच्या सूचना हवेली प्रांताधिकारी अस्वले यांना दिल्या. तसेच भक्ती सोपान पुलाची डागडुजी साठी आवश्यक निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या.

---Advertisement---

इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढणे बाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे सहकार्य घेतले जाईल, तसेच येत्या काळात जलपर्णी नियमित काढता यावी या साठी आळंदी नगरपरिषदेस जेसीबी, पोकलँड मशीन खरेदी करण्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल असे जिल्हाधिकारी दिवसे यांनी सांगितले.

सुरक्षित वारी, हरित वारी या संकल्पनेवर आधारित या वर्षीची वारी असावी, राज्यभरातून वारी साठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणानी आपापसात समन्वय ठेवून कामकाज करण्याचे सूचनादेश पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आळंदीतील अचानक पाहणी दौऱ्यात उपस्थित अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांना दिले.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील यांनी विविध मागण्या करीत संवाद साधला. पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांनी अचानक पाहणी दौरा करीत येथील कामाची पाहणी करीत आषाढी यात्रा तयारीचा आढावा घेतला.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या

पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

---Advertisement---

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles