आळंदी / अर्जुन मेदनकर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटी तून श्री’चे भव्य नृसिंव्ह अवतारातील वैभवी रूप डॉ. अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी परिश्रम पूर्वक साकारले. श्रीचे वैभवी रूप पाहण्यास आळंदी मंदिरात भाविकांनी गर्दी केली. यासह देवस्थानने भाविकांसाठी सोशल मिडीयाचा वापर करून श्रींचे चंदन उटी रूपदर्शन उपलब्ध करून दिल्याने भाविकांतुन समाधान व्यक्त करण्यात आले. (Alandi)
आळंदीत नृसिंह जन्मोत्सवा निमित्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ येथे परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा झाली. श्री संत गोरोबा काका समाधी मंदिर या ठिकाणी लक्षवेधी चंदन उटी साकारण्यात आली. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली.
आळंदीत विविध मंदिरांत चंदन उटी लेप लावण्यास चैत्रात सुरुवात होते. नृसिंह जयंती निमित्त श्रीचे संजीवन समाधीवर विविध लक्षवेधी विविध वस्त्रालंकार, आभूषणे आणि पुष्प सजावट वापरून चंदन उटी लावण्यात आली.
व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थांनच्या प्रथा प्रमाणे मंदिरात नृसिंव्ह जयंतीचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन केले. नृसिंह जयंती निमित्त माऊली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत जन्मोत्सव उत्साहात करण्यात आली. Alandi
यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने जन्मोत्सवावर आधारित ह. भ. प. तुकाराम महाराज मुळीक यांची कीर्तन सेवा झाली. आळंदी देवस्थांनचे विश्वस्त योगी निरंजन नाथजी, व्यवस्थापक माऊली वीर, श्रींचे चोपदार, मानकरी, सेवक आदींसह भाविक उपस्थित होते. श्रीनां धुपारती झाल्या नंतर मानकरी संतोष मोझे यांचे वतीने हरीजागर झाला.
चंदन उटी साठी संत गोरोबा काकांचे वंशपरंपरागत पुजारी किशोर दाते, किरण दाते आणि सहकारी यांनी वैभवी अवतार साकारला.