Home पुणे - पिंपरी चिंचवड Alandi : आमदार बाबाजी काळे, आमदार बापूसाहेब पठारे यांना आळंदीत मानपत्र प्रदान...

Alandi : आमदार बाबाजी काळे, आमदार बापूसाहेब पठारे यांना आळंदीत मानपत्र प्रदान सन्मान सोहळा साजरा

Alandi

आळंदी (अर्जुन मेदनकर) : ओळख श्री ज्ञानेश्वरी – एक परिवार आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, आळंदी यांचे वतीने वडगावशेरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे, खेड आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचा आळंदीत जाहीर सत्कार करीत मानपत्र प्रदान सोहळा उत्साहात साजरा झाला. (Alandi)

ओळख श्री ज्ञानेश्वरी – एक परिवार समिती, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांचे वतीने मानपत्र प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानी ह. भ. प. शंकर महाराज पांचाळ गुरुजी होते.

या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, खजिनदार डॉ.श्री ज्ञानेश्वर पाटील, शिरूर उपसंघटक अनिता झुजम, माजी नगरसेवक आनंद मुंगसे, उत्तमराव गोगावले, संजय वडगावकर, तुकाराम अण्णा गवारी, नंदकुमार वडगावकर, ॲड विष्णू तापकीर, अर्जुन मेदनकर, विलासराव वाघमारे, तानाजी चौधरी, चंद्रकांत गोरे, ज्ञानेश्वर जाधव, श्रीधर सरनाईक, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, राजेंद्र जाधव, सोपान काळे, सुरेश चौधरी, रमेश चौधरी, विलास कुऱ्हाडे, मंगेश तीताडे, धनाजी काळे, कैलास अव्हाळे, विश्वंभर पाटील, निर्मला चव्हाण, प्राजक्ता भोसले, ताई महाराज मानकर संध्याताई काळे, संगीता पाटील, माजी उपाध्यक्ष विलास घुंडरे पाटील, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार अंतर्गत विविध शाळांत पाठ घेणारे अध्यापक साधक महाराज अध्यापक यांचेसह शिक्षण संस्था चालक, वारकरी महिला मंडळाचे पदाधिकारी साधक, यांचेसह आळंदी ग्रामस्थ पदाधिकारी, भाविक, वारकरी उपस्थित होते. (Alandi)


यावेळी आमदार बाबाची काळे म्हणाले श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ सुमारे 40 हजार घरांमध्ये मोफत पोहोचण्याचे कार्य माऊलींच्या कृपेने झाले असून मी व माझे कुटुंबीय माळकरी असून वारकरी संप्रदाय याचे अनुष्ठान असल्यामुळे आज मी आमदार पदापर्यंत पोहोचलो आहे यात वारकरी संप्रदायाचा वारकरी भाविकांचा खेडमधील ग्रामस्थ मतदारांचा सिंहाचा वाटा आहे.

विविध प्रश्न यापुढील काळात निश्चित मार्गी लावली जातील असे सांगत ते म्हणाले इंद्रायणी नदीचे प्रदूषण मुक्त होण्यासाठी विधानसभेत पहिल्याच भाषणात आपण सदरचा विषय घेत या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले भविष्यात सातत्याने पाठपुरावा करून इंद्रायणी नदीचे पाणी वारकरी भाविकांना थेट प्राशन कसे करता येईल यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देत त्यांनी विविध विकास कामांचा तसेच ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमाचा आढावा घेत उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, ओळख ज्ञानेश्वरी एक परिवाराचा संत साहित्य शाळांच्या माध्यमातून मुलांच्या सहकार्याने घराघरात नेण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीने केलेल्या मागणीप्रमाणे ओळख ज्ञानेश्वरी एक परिवार उपक्रमांतर्गत तसेच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भविष्यात संत साहित्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी शालेय मुलांना अभ्यासक्रमातच संत साहित्य देण्यासाठी निश्चित विधानसभेच्या सभागृहातून प्रयत्न केले जातील यासाठी येत्या अधिवेशनात अवचित त्याचा मुद्दा म्हणून प्रश्न उपस्थित केला जाईल, अशी ग्वाही यावेळी बोलताना आमदार पठारे यांनी दिली. (Alandi)

कार्यक्रमाच्या प्रारंभी वडगाव शेरी विधानसभेचे आमदार बापूसाहेब पठारे व आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांचे उपस्थित महिलांनी औक्षण करून स्वागत केले.

यावेळी श्रीराम कृष्ण वारकरी शिक्षण संस्थेच्या कल्याणी शिंदे यांनी यावेळी पखवाज वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मोठी दाद दिली. ह.भ. प. ताई मानकर महाराज व सहकारी यांच्या स्वागत गीत गायनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. तत्पूर्वी श्रींचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते झाले.

ओळख श्री ज्ञानेश्वरी – एक परिवार समितीचे सदस्य, तसेच वडगावशेरी – पुणे परिसरातील अनेक शाळा / विद्यालयात ओळख श्री ज्ञानेश्वरी व हरिपाठ आदी संत साहित्य, श्री माऊलींचे साहित्याचा प्रचार व प्रसार या शालेय मुलासाठी सुरू असलेल्या संस्कारक्षम उपक्रमात तन मन धनाने सक्रिय सहभागी असलेले व्यक्तिमत्त्व आणि या उपक्रमाचे मार्गदर्शक वडगावशेरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे, तसेच खेड तालुक्यातील घराघरात माऊलींचे साहित्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देवून संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणारे व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेवून जात आळंदी – देहू पंचक्रोशीतील घराण्यातील सांप्रदायिक व्यक्तिमत्त्व ज्यांची नुकतीच खेड आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार पदी निवड झालेले आमदार बाबाजी काळे यांना जाहीर सन्मान आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. (Alandi)

या सन्मान व मानपत्र प्रदान सोहळ्याचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार सर्व घटक संस्था यांच्या वतीने कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू तापकीर, अनिताताई झुजम यांच्या सह विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती मान्यवर यांनी नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे, आमदार बाबाजी काळे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, अध्यापक ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रम, पत्रकार संघ यांनी या सन्मान सोहळ्याचे संयोजन केले.

प्रास्ताविक श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश तात्या काळे यांनी केले. डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी मानपत्र वाचन व सूत्रसंचलन केले. आभार भागवत काटकर यांनी मानले. सांगता पसायदान गायनाने झाली.