आळंदी / अर्जुन मेदनकर : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर प्रशालेत गांधी जयंती निमित्त इयत्ता चौथी रायगड गटाच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी विद्यार्थी शंकर भोजने, प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी विश्वेश जोशी हे होते.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विशेष बाब म्हणजे दुसरी तील इशा कुऱ्हाडे या विद्यार्थिनीने इंग्रजी भाषेतून महात्मा गांधीचे जीवनपट उलगडले. (ALANDI)
बाल सभेचे प्रमुख पाहुणे विश्वेश जोशी यांनी संस्कृत मधून गांधीजींच्या जीवनकार्याची माहिती दिली.
मुखाध्यापक प्रदीप काळे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे महत्त्व स्पष्ट करून स्वच्छतेचे महत्व सांगितले, मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी माहिती सांगितली. (ALANDI)
आपला भारत देश स्वच्छ व सुंदर असावा या गांधीजीच्या विचारसरणीनुसार प्रशालेने संपूर्ण शालेय परिसर, शालेय इमारत विद्यार्थी व शिक्षक यांनी स्वच्छ केली. या नावीन्यपूर्ण उपक्रमास संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी शुभेच्छा दिल्या.
बालसभेचे सूत्रसंचालन ओवी मालुंजकर या विद्यार्थिनींनी केले. याच्या कार्यक्रमाचे नियोजन वैशाली शेळके यांनी केले.
आयोजनासाठी प्रशालेतील वर्षा काळे, निशा कांबळे, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण या शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.