आळंदी (अर्जुन मेदनकर) : नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील आनंदाश्रम मधील सच्चिदानंद श्री सद्गुरु भगवान माऊली यांचे सोमवारी एकादशी दिनी ( दि. 10 ) महानिर्वाण झाले. (Alandi)
ते आनंद संप्रदायातील एक थोर संत विभूती मानले जातात. संपुर्ण महाराष्ट्र मध्ये त्यांचा मोठा साधक शिष्य परिवार आहे. त्र्यंबकेश्वर येथे ११ ते १९ मार्च या कालावधीत बाबांच्या वैकुंठ गमन निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. (Alandi)
१९ मार्च रोजी त्यांचा समाधी उत्सव संपन्न होईल. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, प्रा. श्रीधर घुंडरे पाटील, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यापक हभप उल्हास महाराज सुर्यवंशी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, पत्रकार संघ, आनंदाश्रम हनुमान वाडी, आळंदीकर ग्रामस्थ आदी संस्थांचे तर्फे बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Alandi : सच्चिदानंद श्री सद्गुरु भगवान माऊली यांचे महानिर्वाण
- Advertisement -