आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील कुरुळी भैरवनाथ विद्यालयाने यावर्षीही श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्य ढोल लेझीम या वाद्यांच्या गजरात मिरवणुक काढीत शालेय मुलांचे गणेशोत्सवातील जल्लोषात श्रींचे विसर्जन मिरवणूक काढली. (ALANDI)
यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक संगिता भगत, भाऊसाहेब थोरात, निवृत्ती भुजाडे, सतिश नायकवाडी, कल्पना सरवदे, सुवर्णाचे मोरे, पूनम शिंदे, संदीप सासवडे, सरवस्ती सोनवणे, ग्रीष्मा कुदळे, अशोक मिसाळ, कांता मोरे, शुभांगी चिपाडे, कांचन बेल्हेकर, लक्ष्मण करे, सरिता पवार, रसिका दौंडकर, प्रज्ञा गुरव, बाळासाहेब मुळे, संतोष भोसले, प्रदीप लोखंडे, हिरामण ढेंगळे, मुख्याध्यापक रावसाहेब व्यवहारे, संस्थेचे संचालकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.
श्रीगणेशाचे विसर्जन झाल्यावर खिरापत प्रसादाचे वाटप करीत विसर्जन मिरवणुकीची शांततेत सांगता झाली.