Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांची फेरनिवड

ALANDI : आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांची फेरनिवड

आळंदी / अर्जुन मेदनकर : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी प्रमुख विश्वसपदी विधीतज्ञ राजेंद्र बाबुराव उमाप यांची फेर निवड करण्यात आली आहे. अशी माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली. (ALANDI)

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीची पुण्यात मासिक सभा झाली या सभेत सर्वानुमते पुढील वर्षभराचे कालावधीसाठी सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांची प्रमुख विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. कमिटीची मासिक सभा पुण्यात झाली. (ALANDI)

या सभेत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त विश्वस्त निवडी साठी माहे ऑगस्ट २०२४ ची सभा दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी संस्थानच्या पुणे कार्यालयात झाली. या सभेत १ ऑगस्ट २०२४ पासुन सन २०२४-२०२५ या वर्षा साठी विधितज्ज्ञ राजेंद्र बा. उमाप विश्वस्त यांची श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त म्हणून सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.

या मासिक सभेस विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजनानाथ गुरु शांतीनाथ, विश्वस्त डॉ. भावार्थ रा. देखणे उपस्थित होते. विधितज्ञ राजेंद्र उमाप पुण्यातील प्रथितयश विधीज्ञ असुन महाराष्ट्र-गोवा बार कैन्सिलचे विद्यमान अध्यक्ष, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, चिंचवड, ( थेउर, मोरगांव, सिध्दटेक, अष्ठविनायक ) या देवस्थानचे विद्यमान विश्वस्त आहेत. तसेच जिजामाता महिला सहकारी बैंक लि च्या व्यवस्थापन मंडळावर चेअरमन म्हणुन काम पाहत आहे. उमाप यांनी सन २०१३ मध्ये पुणे बार असोशिएशनचे अध्यक्ष पद देखील सांभाळले आहे.

आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी उमाप यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

संबंधित लेख

लोकप्रिय