आळंदी (अर्जुन मेदनकर) : जगतगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन वर्षा निमित्त आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथून पुणे येथील कोरेगाव हेलिपॅड वरून संगमनेर येथील बोटा येथे रविवारी ( दि.22 ) हेलिकॉप्टरने हरिनाम गजरात रवाना झाल्या. (Alandi)
पुणे ते बोटा या दरम्यान विविध मंदिरांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर आणि यजमान आदर्श सरपंच जालिंदर गागरे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या पवित्र वैभवी पादुका श्री क्षेत्र बोटा येथे तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सुरु होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा परायण सोहळ्यामध्ये पादुका ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत हेलिकॉप्टरने हरिनाम गजरात नेण्यात आल्या. श्रीक्षेत्र देहू येथून सकाळी श्रींचे वैभवी पादुका कोरेगाव पार्क येथील हेलिपॅडवर हरिनाम गजरात वाहनाने पोहोचल्या.
तेथून दुपारचे सुमारास पादुका हेलिकॉप्टर मधून बोटा येथे मार्गस्थ झाल्या. दरम्यान हेलिकॉप्टर मधून श्रीक्षेत्र आळे येथील श्री रेडा समाधी मंदिरावर तसेच परिसरातील काही स्वयंभू मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. श्रींचे पादुकां समवेत श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे आणि यजमान सरपंच जालिंदर गागरे या मान्यवर यांच्या हस्ते विविध ठिकाणी मंदिरांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. (Alandi)
विविध मंदिरांत पुणे आणि अहील्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुमारे 40 मंदिरांवर पुष्पवृष्टी उत्साहात करण्यात आलीं. विविध मंदिरांवर पुष्पवृष्टी करत हेलिकॉप्टर मार्गे श्री रेडा समाधी मंदिर आळे, आई कळमजाई माता मंदिर मोरदरा, मळगंगा माता मंदिर म्हसवंडी, रामदास बाबा मंदिर बेलापुर, भोजामाता मंदिर भोजदरी, खंडोबा मंदिर वनकुटे, हनुमान मंदिर कोठे खुर्द, हनुमान मंदिर जवळेबाळेश्वर, कळमजाई माता महाल वाडी, श्रीखंडोबा मंदिर सावरगाव घुले, श्रीक्षेत्र बाळेश्वर शिखर मंदिर, शिव मंदिर पोखरी बाळेश्वर, कानिफनाथ मंदिर तळेवाडी, बिरोबा महाराज मंदिर साकुर, भगवती माता मंदिर नांदुर, विठ्ठल मंदिर येठेवाडी, खंद्रेश्वर मंदिर खंदरमाळ वाडी, काळ भैरवनाथ डोळासणे, म्हसोबा मंदिर वरुडी, गोपाल कृष्ण सारोळे, काळभैरवनाथ माळेगाव, शनैश्वर मंदिर, आंबी खालसा, हनुमान मंदिर तांगडी, खंडोबा मंदिर कोठे बुद्रुक, सावता बाबा बोरबन, महादेव मंदिर घारगाव, बोलआई मंदिर कुरकुंडी, मुक्ताई माता मंदिर बोटा, हनुमान श्रीकृष्ण आभाळ वाडी, भागाई माता मुंजेवाडी, श्री दत्तमंदिर अकलापुर, महालक्ष्मी मंदिर केळे वाडी, हनुमान मंदिर आळेखिंड, श्रीकृष्ण मंदिर माळवाडी, श्रीरोकडेश्वर मंदिर आंबीदु माला, श्रीराम मंदिर कुरकुटवाडी, कचेश्वर मंदिर बोटा, हेलीपॅड अशा विविध मंदिरांवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी झाली. (Alandi)
धार्मिक सोहळ्याचे पर्वणीत ही पुष्पवृष्टी करण्यात आली. बोटा येथे मोठा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळा सुरू होत आहे. त्या वैभवी सोहळ्याचे पूर्व संध्येला ही वैभवी पुष्पवृष्टी होत असल्याचे प्रशांत महाराज मोरे यांनी सांगितले. या साठी जिल्हा व राज्य शासनाने देखील परवानगी देत सहकार्य केले.
ही वैभवी पुष्पवृष्टी आणि श्रींचे पवित्र पादुका बोटा येथे मंगलमय धार्मिक कार्यक्रम परंपरांचे पालन करीत आणण्यात आल्या. या अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्यात राज्यातील तसेच जागतिक आणि राष्ट्रीय कीर्तनकार यांची कीर्तन, प्रवचन सेवा रुजू होत आहे. या सोहळ्या तील ज्ञानदान, आणि अन्नदान महाप्रसाद वाटप सेवा परंपरेने होत आहे. भाविक, नागरिकांनी या पर्वणीचा तसेच श्रवण सुखाचा लाभ घेण्यासाठी सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन यजमान बोटा पंचक्रोशीतील ग्रामस्थ संयोजकांनी केले आहे.
येथे सोहळ्यास तसेच श्रींचे पादुका दर्शनास भाविकांनी मोठी गर्दी केली.पादुका हेलिकॉप्टरने दोन वाजत बोटा येथे मार्गस्थ होत चार वाजता हरिनाम गजरात पोहोचल्या.
तत्पूर्वी सकाळी दहा वाजता श्री क्षेत्र देहू मधील संत तुकाराम महाराज मंदिरा मध्ये पादुकांना अभिषेक, पूजा आणि आरती झाल्यानंतर पुणे येथुन श्री संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह. भ. प. प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर आणि आदर्श सरपंच यजमान जालिंदर गागरे समवेत होते.
तुकोबांच्या पादुका बोटा येथे मार्गस्थ झाल्यानंतर प्रवासा दरम्यान आळे येथील रेडा समाधी मंदिर आणि परिसरातील ४० मंदिरांवर त्यांच्या वतीने पुष्पवृष्टी हरिनाम गजरात करण्यात आली. बोटा येथे तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.