सांडपाणी वाहू नलिका नादुरुस्तने नागरिकांची गैरसोय (ALANDI)
आळंदी / अर्जुन मेदनकर : ज्यांची सर्व सामान्य जनता, शेतकरी आतुरतेने वाट पाहत होती, तो पाऊस सुरु होऊन अखेरच्या टप्प्यात असताना आळंदीसह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नागरिक, शेतकरी, वाहनचालक यांची रहदारीत आणि शेतीच्या कामात मोठी गैरसोय झाली. जोरदार झालेल्या पावसाने हाती आलेले सोयाबीनचे पीक क्षतिग्रस्त होऊन नुकसान होण्याची भीती शेतकरी यांनी व्यक्त केली आहे. (ALANDI)
आळंदी पंचक्रोशीत जोरदार पाऊस झाल्याने रहदारी सुमारे दोन तास मंदावली. रहदारीत नागरिक, वाहन चालक मिळेल त्या ठिकाणी आसरा शोधून दोन तासावर थांबले. अनेक ठिकाणी खड्यासह साईड पट्या खराब झाल्याने रस्त्याचे दुतर्फ़ा तसेच खराब रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचून रहदारीला गैरसोयीचे झाले.
आळंदी, सोळू, धानोरे, वडगाव घेनंद आणि परिसरात पाऊस झाला. कामगार, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना मात्र घरी जाताना आलेल्या पावसाने भिजत जावे लागले. आळंदी वडगाव रस्त्यावरून दुतर्फा पाणी वाहत होते. खड्या मुळे अनेक ठिकाणी वाहने सावकाश जात होती. वडगाव घेनंद येथील भोसे रस्ता वडगाव घेनंदचे हद्दीत मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने रस्त्यावर पाणी साचलेने वाहन चालकाना मात्र वाट काढीत जावे लागले.
सुमारे एक किलो मीटरचा रस्ता वडगाव घेनंद हद्दीत खराब असून अजून काम पूर्ण न झाल्याने भोसेकडे जाताना मात्र गैरसोयीचे ठरत आहे. तात्काळ रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची गरज शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर यांनी व्यक्त केली आहे.
आळंदी येथील भैरवनाथ चौक, मरकळ रस्ता, वडगाव रस्त्याचे कडेने पावसाळी पाणी रस्त्याचे दुतर्फ़ा गटारात पाणी जात नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहत राहिले. पावसाळी गटर्स कडे पाणी कसे जाईल याचे नियोजन करण्याची मागणी दक्षता सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण नरके यांनी केली.