आळंदी / अर्जुन मेदनकर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आळंदी देवस्थानचे वतीने शनिवारी आळंदी देवस्थाने पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त योगी निरंजन नाथसहेब, विश्वस्त डॉ. भावर्थ देखणे यांनी भेट घेऊन यंदाच्या वर्षीचे महात्म्य विशद केले. (ALANDI)
यंदाचे वर्ष हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवाचे ७५० वे वर्ष असल्यामुळे या बाबत काही कार्यक्रमांमध्ये नितीन गडकरी यांचे सुद्धा सहकार्य असावे तथा या निमित्ताने पालखी महामार्गावर देखील काही विशिष्ट फलक लावण्यात यावे अशी विनंती संस्थान तर्फे करण्यात आली.
पालखी महामार्ग हा अजून सुकर कसा होईल. यासाठी एन एच ए आय च्या अधिकाऱ्यां सोबत दर तीन महिन्यात एक बैठक होणे आवश्यक आहे असे संस्थानच्या विश्वस्तांनी सांगितल्यावर माननीय मंत्र्यांनी ते तात्काळ मान्य केले. (ALANDI)