Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : इंद्रायणीत उडी घेतलेली महिला पोलीस कर्मचारी अद्याप बेपत्ता ; आळंदीत...

ALANDI : इंद्रायणीत उडी घेतलेली महिला पोलीस कर्मचारी अद्याप बेपत्ता ; आळंदीत शोध सुरु

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील गरुड स्तंभ येथून इंद्रायणी नदीचे पाण्यात उडी घेतलेली वीस वर्षीय महिला पोलीस कर्मचारी यांचा ( दि २५ ) पासून आळंदी परिसरातील इंद्रायणी नदी पात्रात शोध सुरु असून सोमवारी ( दि २६ ) सायंकाळ पर्यंत बेपत्ता महिला पोलीस कर्मचारी मुलीचा शोध लागला नाही. मंगळवारी ( दि २७ ) सकाळी शोध मोहीम राबवली जाणार असल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितले. (ALANDI)

रविवारी ( दि २५ ) अनुष्का सुहास केदार ( वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी ) असे उडी मारलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांचे नाव आहे. या महिला पोलीस कर्मचारी यांचे शोधासाठी आळंदीत आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरु केली. अनुष्का केदार यांचे नदी पात्रात शोधासाठी मंगळवारी देखील शोधण्याचे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. (ALANDI)

या शोध मोहिमेत एनडीआरएफ कडील ३० जवान, ४ बोटीद्वारे इंद्रायणी घाट आळंदी परिसरात शोध घेण्यात आला. यासाठी आळंदी नगरपरिषद कडील १ बोट, ६ कर्मचारी यांची हि मदत घेण्यात आली. यात च-होली खुर्द, च-होली बुद्रुक, च-होली बायपास या ठिकाणी शोध घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या कडील ११ जवान, १ बोट द्वारे सोळू, वडगाव, गोलेगाव तसेच इतर इंद्रायणीच्या पात्रात देखील शोध मोहीम राबविण्यात आली. आळंदी पोलीस स्टेशन मधील ३ अधिकारी आणि २५ पोलिस अंमलदार यांनी इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूने शोध घेण्यास परिश्रम घेत शोध कार्य केले. (ALANDI)

मात्र सोमवारी सायंकाळ पर्यंत बेपत्ता मुलीचा शोध लागला नाही. यामुळे उद्या मंगळवारी ( दि २७ ) पुन्हा सकाळी शोध मोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वारिष पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी सांगितले आहे. इंद्रायणी नदीचे लाभक्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने नदी पूर आला असून शोध कार्यात यामुळे बाधा येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय