आळंदी : देशी गोवंश बचाव जन आंदोलन संघटनेचे मिलिंद एकबोटे यांच्या सह इतर गौ प्रेमिंच्या वतीने केलेले उपोषण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशावासनानंतर स्थगित करण्यात आले. (ALANDI)
यावेळी देशी गोवंश पालनासाठी प्रतिदिन प्रति गोवंश शंभर रुपये शासनाकडून मिळतील. असे आश्वासन एकबोटे यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी फोनवर बोलताना दिले.
आमदार महेश लांडगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकबोटे यांच्यात फोनवर चर्चा घडवून आणली.बाकीच्या मागण्यावर चर्चा झाली नाही. (ALANDI)
यावेळी महायोग आश्रम असवली (सातारा) येथील पिठाधीपती व संत सदगुरु श्री उदयनाथ महाराज यांनी आळंदी इंद्रायणी तीरी गेले दोन दिवसांपासून गोहत्या बंदी व गोसेवा समस्या निर्मूलनासाठी एकबोटे यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषण स्थळी भेट देवून त्यांना पाठिंबा दिला.
राज्य शासनाने या आमरण उपोषणाची त्वरित दखल घेऊन उपोषण कर्त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा राज्यभर गोसेवक अन्य मार्गाने आंदोलन करतील.असा इशारा देखील महाराजांनी या वेळी दिला.
मागण्या-
गौपालनासाठी प्रति गौ शंभर रुपये मिळावे. आळंदी येथील दारूबंदी व वेश्या व्यवसाय बंद करावे, इंद्रायणी नदीचे प्रदूषण त्वरित रोखावे, भटक्या जनावरांची कत्तल थांबवून स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर गो शाळा उभाराव्या.
देशी गायरानांचे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी गोपालन, चारा लागवडी साठी जमीन उपलब्ध करून द्यावेत.