आळंदी / अर्जुन मेदनकर : आळंदीत कार्तिकी एकादशी निमित्त पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी नगरपरिषदेने महावितरणचे माध्यमातून समनव्यातुन उपाय योजना केल्या आहेत. वीज पुरवठा खंडित होऊ नये साठी देखील काळजी घेण्यात आली आहे. दरम्यान टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा देखील सुरु ठेवण्यात आला आहे. (Alandi)
आज आळंदीत कार्तिकी एकादशी आळंदी कार्तिकी यात्रेतील भागवत एकादशी मंगळवारी ( दि.२६ ) साजरी होत आहे. यानिमित्त माऊली मंदिरात पहाट पूजेत श्रींचा पवमान अभिषेक, दुधारती, ११ ब्रम्हवृंदांचा वेदमंत्रजय घोष होणार आहे. श्रीना महानैवेद्य, श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा होणार आहे. श्रींचे दर्शन व मंदिरात धुपारती व परंपरेने संतोष मोझे यांचे वतीने जागर होणार आहे.
द्वादशी दिनी बुधवारी ( दि. २७ ) श्रींचा आळंदीत रथोत्सव होणार आहे. दरम्यान भाविकांचे स्वागताची मंदिरात तयारी पूर्ण झाल्याचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितले. यावर्षी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे मागणी नुसार पुरातन १५० वर्षांचे पूर्वीचा तसेच श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांनी खास सिसम लाकडा पासून बनविलेला २३ फूट उंच वैभवी रथोत्सव आळंदीत सोहळ्याचे खास आकर्षण आहे.
यासाठी तयारी देखील पूर्ण करण्यात आली आहे. आळंदीला भक्त निवासाची गरजआळंदीतील कार्तिकी निमित्त चाकण चौक येथील शाळेच्या मैदानावर तसेच नदी परिसरातील मोकळ्या जागांवर भाविकांनी राहुट्या उभारून निवारा व्यवस्था केली आहे.
कार्तिकी यात्रा अनुदान आणि राज्य तीर्थक्षेत्र निधीतून भाविकांसाठी विकास आराखड्यातील राखीव जागेत भक्त निवासाची व्यवस्था करण्याची मागणी आळंदी ग्रामस्थ ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी केली आहे. मंदिर परिसरात धोकादायक इमारती वापरास यात्रा काळात बंद ठेवण्यात आल्या आहेत. या इमारतींना देखभाल दुरूस्ती करण्यास परवानगी देण्याची गरज असताना मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
संत साहित्याने दुकाने बहरली
यात्रेत भाविकांना तुळशीचे माळा, वारकरी संत साहित्यादी उपलब्ध झाले आहे. माऊली मंदिरात वारकऱ्यांना मोफत औषध वाटप विविध सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून सुरु झाले आहे. वारकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी माऊली मंदिरात पोलीस सुरक्षेस तैनात करण्यात आले आहेत. मंदिरात प्रसाद वाटप सुरू आहे. महिला व पुरुष सेवक स्वकामचे सेवा मंडळाचे स्वयंसेवक अध्यक्ष सुनील तापकिर यांचे नियंत्रणात सेवा देत आहेत. (Alandi)
माऊली भक्तांना खिचडी वाटपास सेवारत झाले आहेत. झाडी बाजारात प्रसाद पेढे व माळेंची दुकाने थाटली असल्याने लक्षवेधी दिसत आहेत.