आळंदी – (अर्जुन मेदनकर) संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी देवाची यांच्या वतीने शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा नुकताच आळंदी देवाची येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी देवाची येथे नुकताच सत्कार करण्यात आला. (Alandi)
याप्रसंगी आळंदी संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांनी डॉ. उज्जैनकर यांचा संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा, शाल, श्रीफळ भेट देऊन नुकताच संस्थांच्या कार्यालयात सत्कार केला.
उज्जैनकर फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन नुकतेच 4 जानेवारी 2025 रोजी आळंदी देवाची येथे ऐतिहासिक भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न झाले.
त्यानंतर एका महिन्याने डॉ. उज्जैनकर यांनी 4 व 5 फेब्रुवारी 2025 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील 11 शाळांमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरी, हरिपाठ व पसायदान यांचा प्रचार व प्रसाराचा कार्यास प्रारंभ केला. (Alandi)
याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा या महा उपक्रमाचे प्रचारक श्री प्रकाश काळे चरित्र समितीचे उपाध्यक्ष तुकाराम गवारी कार्याध्यक्ष विलास वाघमारे यांच्यासह उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर येथील प्रा. डॉ. सुभाष बागल उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सल्लागार आळंदी येथील रामकृष्ण रामचंद्र कुराडे पाटील फाउंडेशनचे राज्य सल्लागार पुणे येथील बाळकृष्ण अमृतकर सर फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ फाउंडेशनचे पुणे जिल्हा सचिव विलास शिवले सर पुणे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ बुडुखले गुरुजी पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पत्रकार अर्जुन मेदनकर सर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पोतदार साहेब फाउंडेशनचे आजीव सभासद सचिन उज्जैनकर व अंकित नायसे याप्रसंगी उपस्थित होते. (Alandi)
याप्रसंगी आळंदी संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ व ज्ञानेश्वर चरित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे मुख्य प्रचारक प्रकाश काळे यांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या कार्याचे याप्रसंगी कौतुक केले.
Alandi : डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा झाला आळंदीत सत्कार
- Advertisement -