Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : थोरल्या पादुका मंदिरात ज्ञानेश्वरी जयंती साजरी

ALANDI : थोरल्या पादुका मंदिरात ज्ञानेश्वरी जयंती साजरी

आळंदी / अर्जुन मेदनकर : वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त पंच दिवशीय अखंड हरिनाम सप्ताह विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रथा परंपरांचे पालन करीत ज्ञानेश्वरी जयंती साजरी करण्यात आल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली. (ALANDI)

अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत हरिनाम गजरात करण्यात आले. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व ह. भ.प. चंद्रकांत महाराज खेडकर यांनी केले. या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता श्री ज्ञानेश्वरी जयंती दिनी झाली.

यावेळी आळंदी येथील राष्ट्रीय भागवताचार्य गजानन महाराज सोनुने यांची प्रवचन सेवा झाली. ह. भ.प. चंद्रकांत महाराज खेडकर, भागवताचार्य गजानन महाराज सोनुने यांचा सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देऊन करण्यात आला. (ALANDI)

या प्रसंगी खजिनदार दत्तात्रय गायकवाड, शांताराम तापकीर, कीर्तनकार सविता काळजे, पंडित तात्या तापकीर, संभाजी तापकीर, रमेश महाराज घोंगडे, संदीप काळजे, मनोहर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री पांडुरंगरायांची आरती झाली. महिलां भाविकांची मोठी गर्दी कार्यक्रमास झाली होती.

यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आले. ज्ञानेश्वरी जयंतीचे धार्मिक कार्यक्रमाची सांगता पसायदान गायनाने हरिनाम गजरात झाली.

संबंधित लेख

लोकप्रिय