Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : आळंदी माऊली मंदिरात ज्ञानेश्वरी जयंती साजरी

ALANDI : आळंदी माऊली मंदिरात ज्ञानेश्वरी जयंती साजरी

उपमुख्यमंत्री यांना माउलींच्या जन्मोत्सव महोत्सवाचे बोधचिन्ह भेट (ALANDI)


आळंदी / अर्जुन मेदनकर : श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती दिनानिमित्त आळंदीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


हरिनाम गजरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रदक्षिणा करण्यात आली. या जयंती दिना निमित्त श्री ज्ञानेश्वरी जयंती दिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव या महोत्सवाचे बोधचिन्ह देऊन आळंदी देवस्थान तर्फे सन्मानित करण्यात आले.

यावर्षी आळंदीसह परिसरात सर्वत्र श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२४ – २०२५ साजरे केले जात आहे. (ALANDI)

या वर्षातील श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी तील १८ वा अध्यायाचे पारायण, कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध धार्मिक कार्यक्रमात श्री ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन सेवा रुजू झाली.

तसेच कैलास महाराज पवार यांनी प्रवचन केले. देवस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी कीर्तन सेवा रुजू केली. जयंती दिनी ज्ञानेश्वर महाराज फलके यांचे प्रवचन झाले. कैलास महाराज येवले यांचे कीर्तन झाले.

मंगळवारी ( दि.२४ ) श्री क्षेत्र देवगड संस्थानचे भामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीची परंपरेने आळंदीतून टाळ, मृदंग, वीणेच्या त्रिनादासह हरिनाम जयघोषात ग्राम प्रदक्षिणा झाली. शिवसेनेचे नेते ( उबाठा ) बाबाजी काळे यांनी प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी पोहचवण्याचा संकल्प केला होता.

त्या प्रमाणे श्री ज्ञानेश्वरी जयंती पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करीत २१ हजार भाविक, नागरिक, महिला यांना रंथराज श्री ज्ञानेश्वरी भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपत संतांचे साहित्य घर घरात पोहोचविण्याचे कार्यात इतरांना आदर्श निर्माण केला आहे.

ज्ञानेश्वरी जयंतीच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री यांना माउलींच्या जन्मोत्सव महोत्सवाचे बोधचिन्ह भेट दिले.

श्री ज्ञानेश्वरी जयंती दिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव या महोत्सवाचे बोधचिन्ह देऊन आळंदी देवस्थान तर्फे सन्मानित करण्यात आले. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथांचे प्रति महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशन करण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने पुणे लोहगाव येथील विमानतळास श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केल्या बद्दल आळंदी देवस्थानचे विश्वस्त नाथसाहेब तथा योगी श्री निरंजननाथ यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय