आळंदी / अर्जुन मेदनकर : पंढरपूर कडे हरीनामगजरात राज्यातून पालखी सोहळे मार्गस्थ होत आहेत. यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यासह अनेक संतांचे पालखी सह दिंड्या जात आहेत. या वारीची अनुभुती यावी यासाठी कुरुळीतील भैरवनाथ विद्यालयाने पालखी सोहळ्यासह रिंगण लक्षवेधी उपक्रमाचे हरिनाम गजरात आयोजन केले. पालखी सोहळ्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्राम प्रदक्षिणा करीत दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करुन हि करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. (ALANDI)
रिगंण कुरुळी गावाचे ग्रामवैभव ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आले. या प्रसंगी पांडुरगांची वेषभुषा वेदांत बांगर तसेच रुख्मिणी मातेची वेषभुषा सई गायकवाड या विद्यार्थ्यांनी केली. राहिलेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेष धारण केला होता. (ALANDI)
यावेळी मुख्याध्यापक रावसाहेब व्यवहारे, सहशिक्षक संगिता भगत, भाऊसाहेब थोरात, निवृत्ती भुजाडे, कल्पना सरवदे, सुर्वणा मोरे, पुनम शिंदे, सरस्वती बालघरे, संदीप सासवडे, राजकुमार गायकवाड, ग्रीष्मा कुदळे, अशोक मिसाळ, कांता मोरे, शुभांगी चिपाडे, स्वाती कोळेकर, सरीता पवार, रसिका घाडगे, प्रज्ञा गुरव, यांनी सुध्दा वारकऱ्याची वेषभुषा करुन दिंडीत सहभागी झाले. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. पालखी सोहळ्या सहभागी होऊन आनंद घेतला.
याप्रसंगी ग्रामपंचायती सरपंच अनिता बधाले, उपसरपंच दिपक डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन कड, विशाल सोनवणे तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड, सखाराम बागडे, आत्माराम सोनवणे माजी ग्रामपंचायत सदस्य, भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष एम.के. सोनवणे, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माजी जिल्हा परीषद सदस्य शांताराम सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब बधाले, रामचंद्र बागडे, बाळासाहेब सोनवणे, माजी ग्रामपंचायत सरपंच देवराम सोनवणे, सहसचिव मधुकर नाईक, कार्याध्यक्ष विठ्ठल रुख्मिणी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष गुलाब सोनवणे, खजिनदार, प्रसीद्ध गाडामालक बाळासाहेब सोपान कड, संचालक एकनाथ सोनवणे, बाळासाहेब कड आदींनी उपक्रमास दाद देत विद्यार्थ्याचे कौतुक केले. (ALANDI)


हेही वाचा :
धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक
निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !
दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार
धक्कादायक : बागेतील आंबे खाल्ल्याने अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल