राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर उत्साहात (Alandi)
अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग उपक्रम
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग लोहगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर श्री क्षेत्र देहूगाव येथे उत्साहात सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रमांचे आयोजनात पार पडले. (Alandi)
स्वच्छ भारत सुंदर भारत चा संदेश गावकऱ्यांपर्यंत या शिबिरातून देण्यात आला.
या विशेष शिबिराचे उद्घाटन देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, विश्वस्त श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या संचालिका डॉ कमलजीत कौर व प्राचार्य डॉ एफ बी सय्यद यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे संयोजन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक दिलीप घुले यांनी केले. रासेयो स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन वृक्षारोपण, प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छता, तुकाराम महाराज संस्थान शिळा मंदिर तसेच गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करून स्वच्छ भारत सुंदर भारत चा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचवला. (Alandi)
स्वयंसेवकांनी जलसंवर्धन अभियानांतर्गत गावालगतच्या इंद्रायणी नदी घाट परिसर स्वच्छ करून तीर्थक्षेत्र विकास अभियानाचे महत्त्वपूर्ण काम केले. श्रम संस्कारा सोबतच स्वच्छता फेरी, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करून ग्रामस्थां पर्यंत स्वच्छतेची जनजागृती स्वयंसेवका मार्फत करण्यात आली.
देहू नगरपंचायत नगराध्यक्ष पूजा दिवटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एफ बी सय्यद, विभाग प्रमुख डॉ पंकज आगरकर, डॉ. भाग्यश्री ढाकुलकर, डॉ. नागेश शेळके आदींनी शिबिर सांगता प्रसंगी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीस असेच समाज उपयोगी काम करण्यास शुभेच्छा दिल्या.
शिबिर कालावधीत सोमनाथ आबा मसुगडे, उत्कर्ष पाटील, सनी पाटील, महेश गिरी, दिनेश नगरे, गायत्री पाटील, प्राध्यापिका अमृता मोरे, प्राध्यापिका जयश्री सूर्यवंशी, प्राध्यापिका श्रद्धा खंदारे यांचे सहकार्य लाभले.
शिबिर कालावधीत विठ्ठल काळोखे यांचे व्यक्तिमत्व विकास, डॉ नाना शेजवळ यांचे डिजिटल साक्षरता, प्राध्यापक रोहित गुरव यांचे मैत्री व बाप, ह भ प पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे युथ फॉर माय भारत, देहू प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ यादव सर यांचे आरोग्य विषयक जनजागृती आदी व्याख्याने आयोजित करण्यात आली.
शिबिर यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक दिलीप घुले, अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
Alandi : देहूत स्वच्छ भारत सुंदर भारतचा संदेश
- Advertisement -