आळंदी / अर्जुन मेदनकर : राज्यातील विविध ठिकाणी भाद्रपद महिन्यातील अमावस्या दिनी (दि. २) श्रावणी सोमवार आणि भाद्रपद बैल पोळा शेतकरी परिवारांमध्ये परंपरेने साजरा करण्यात आला. सोमवारी अमावस्या तिथी असल्याने तिला सोमवती अमावस्या हि म्हंटले जाते. (Alandi)
बैल पोळा हा सण महाराष्ट्र आणि छत्तीसगड सारख्या राज्यात साजरा होतो. परतूर सावरगाव बुद्रुक ठाकूर येथेही परंपरेने बैलांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
या सणाशी संबंधित शेतकरी कुटुंबीयांनी बैलांची पूजा करीत सजवलेल्या बैलांची गावांतून मिरवणूक उत्साहात काढली. यावेळी बैलांना नैवेद्य पुराणपोळी वाढविण्यात आली. (Alandi)
या निमित्त बैलांना आंघोळ घालून स्वच्छ पुसून धुवून त्यांना रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली. वस्त्रालंकार घालून बैल लक्षवेधी दिसत होते. गावांतून मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.