टी.बी. मुक्त भारतासाठी तीन महिने सलग मोहीम (ALANDI)
आळंदी / अर्जुन मेदनकर : टीबी मुक्त भारत साठी खेड तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर प्रत्येक्ष १८+ बीसीजी लसीकरण अभियान राबवून टीबी मुक्त भारत व्हावा यासाठी Adult बीसीजी लसीकरण करण्यास मंगळवारी ( दि. ३ ) लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. हि लशीकरां मोहीम सलग पुढील तीन महिने कालावधीसाठी राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले. (ALANDI)
खेड तालुक्यातील सर्व गावांमधे ही मोहिम राबवण्यात येणार असुन सर्व तयारी करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ विलास माने यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यात ही मोहिम राबविण्यात येत आहे. खेड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत मोहिमेची सुरुवात झाल्याचे डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव या ठिकाणी सरपंच शरद मोहिते यांचे हस्ते लसीकरणास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी वैद्यकिय अधिकारी डाॅ. साईनाथ मानकरी, डाॅ इंदिरा पारखे, आरोग्य सहायक संतोष होनावळे, हनुमंत रावते, आरोग्य सेविका श्रीमती आशा दौंडकर, आशा सुपरवायजर श्रीमती छाया इंगळे, आशा स्वयंसेविका शुभांगी इंगळे, उषा कराळे, दुर्गा दौंडकर आदी उपस्थित होते. केळगाव, सोळु आणि वडगाव घेनंद या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात देखील लसीकरणास सुरुवात करण्यात आली. सर्व वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहायक व सहायिका, आशा स्वयंसेविका यांचा या मोहिमेत सक्रिय मिळाला.
लसीकरणाचे लाभार्थी यामध्ये मागील पाच वर्षात TB झालेले रुग्ण, ऍक्टिव्ह TB असणाऱ्यांचे सहवासी, BMI <१८, स्वयं घोषित स्मोकर, स्वयं घोषित मधुमेही, ६०+ नागरिक या सहा कॅटेगिरी चे सर्व लाभार्थींची नोंद घेत उपाय योजना केली तर यांच्या तील ८६ टक्के टीबी रोखण्यास मदत होणार असल्याने प्रशिक्षण देऊन मोहीम राबविण्यात येत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने यांनी सांगतले.
Adult TB implementation स्टडी प्रोग्राम खेड तालुक्यात राबविण्यात येत आहे. पुणे ग्रामीण विभागाचा देखील यात सहभाग आहे. खेड तालुक्यातील सर्व गावांत ही मोहिम राबवण्यात येणार असुन त्याची पूर्वतयारी, प्रशिक्षण व सर्व्हे पूर्ण झाला असून वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ विलास माने यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या मोहिमेत तसेच प्रशिक्षण मध्ये सर्व वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहायक व सहायिका, आशा स्वयंसेविका यांचा मोहिमेत सक्रिय सहभाग झाला आहे.
Adult BCG याचा वापर केल्यास “2025 अखेर टी बी मुक्त भारत” हे उद्देश गाठता यावे यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. मोठ्यांना (selected १८+ वर्ष) बीसीजी लस दिल्यास त्यांना होणारा “TB आजाराचे” प्रमाण कमीत कमी ४० टक्केने रोखता आले तरी तेवढे रुग्ण रोखल्याचा लाभ होणार आहे.