आळंदी (अर्जुन मेदनकर) – येथील हनुमान वाडीतील यु के गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल केळगाव प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त शालेय मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी झील २ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. या व्यासपीठावर विविध कलागुण सादर करीत शालेय मुलांनी शिक्षक पालक नागरिकांची दाद मिळवली. शालेय मुलांच्या जल्लोषमय वातावरणात स्नेहसंमेलन पार पडले. (Alandi)
स्नेहसंमेलनास संस्थेचे अध्यक्ष संदीप मुंगसे, उपाध्यक्ष आप्पासाहेब मुंगसे, सचिव सुखदेव मुंगसे, संचालक गजानन गांडेकर, महेश महाराज भगुरे, ॲड. श्रीकांत भिसे, आळंदी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सुहास दुनघव, संदेश नवले, उदय काळे,विशाल मुंगसे, बाबासाहेब भंडारे, उमेश बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाचा उद्घाटन समारंभ दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन करत झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करीत दर्जेदार शिक्षण देत असल्याबद्दल पालकांनी देखील अभिनंदन करून प्रशालेस शुभेच्छा दिल्या. (Alandi)
यावेळी मुलामुलींनी लक्षवेधी कलाविष्कार सादर करीत नृत्य,नाटिका, भाषण, गायन, मोबाईलसह सोशल माध्यमे यावर समाज प्रबोधन करीत उपक्रम सादर केले. यावेळी नागरिक, पालक, शिक्षक यांनी मोठी दाद दिली.
पालक,नागरिकांना संस्थेतर्फे शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. पसायदान, वंदे मातरम् गीताने वार्षिक स्नेहसंमेलनाची सांगता उत्साहात झाली.
त्यानंतर पालक, शिक्षक, मुले यांनी सुरुची भोजनाचा आस्वाद खेळीमेळीचे वातावरणात घेतला. संस्थेचे अध्यक्ष संदीपभाऊ मुंगसे यांचेसह शालेय शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी स्नेहसंमेलन यशस्वीतेस परिश्रम घेतले.
Alandi : यु के गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन; शालेय मुलांचे कलागुणांसाठी झील २ व्यासपीठ
- Advertisement -