Tuesday, February 4, 2025

Alandi : माऊलींचे थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा उत्सवा निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर यांनी दिली. (Alandi)

पुणे – आळंदी पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात २५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा प्रारंभ २५ जानेवारीला होत आहे. या निमित्त विना पूजन, कलश पूजन, ग्रंथ पूजन शांतीब्रम्ह ह. भ. प. मारोती महाराज कुरेकर यांचे हस्ते होणार आहे.

Alandi

यावेळी सोहळयात श्रींची महापूजा, काकड आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, महिला भजनी मंडळांची भजन सेवा, हरिपाठ, हरी कीर्तन व हरी जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

या शिवाय मान्यवर कीर्तनकार यांची कीर्तन सेवा दररोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहे. एकादशी दिनी ह. भ. प. तुकाराम महाराज ताजणे, मयूर महाराज गोरे, संतोष महाराज सुर्वे, कृष्णा महाराज चवरे, मनोहर महाराज सिनारे, बालाजी महाराज मोहिते, पंडित महाराज क्षीरसागर, शिवाजी महाराज वटंबे, परमेश्वर महाराज वरकड, लक्ष्मण महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. यावेळी कीर्तनकर, प्रवचनकार, भाविक, नागरिक, महिला भजनी मंडळाने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सप्ताहात दैनंदीन पहाटे महापूजा व काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महिला भजनी मंडळांची भजन सेवा, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद, हरीजागर असे कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तत्पूर्वी दिंडी मिरवणूक होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास भाविक, नागरिकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अँड.विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कपिल शर्मासह ‘या’ बॉलीवूड कलाकारांना जीवे मारण्याची धमकी, बॉलीवूडमध्ये खळबळ

‘बर्ड फ्लू’मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा, गावकऱ्यांची कुटुंबावर बहिष्काराची धक्कादायक घटना

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीची 10 लाखांची फसवणूक, मानसिक धक्क्यातून केली आत्महत्या

मोठी बातमी : आगीच्या अफवेमुळे प्रवाशांच्या धावत्या रेल्वेमधून उड्या, समोरच्या एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती

स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित

Related Articles

- Advertisement -

Latest Articles