Thursday, February 20, 2025

वाद चिघळला त्या विधानावरून अल कायदाने “या” शहरात आत्मघाती हल्ल्याची दिली धमकी

नवी दिल्ली : भाजप माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैंगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा वाद आता चिघळला आहे. जगभरातून या विधानाचा निषेध केला जात असताना अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे.

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त विधानावरून जागतिक स्तरावर बंदी घातलेली दहशतवादी संघटना अल-कायदा इन द इंडियन सब-कॉन्टिनेंट (AQIS) ने या प्रकरणी भारताला धमकी दिली आहे. AQIS ने आपल्या धमकीमध्ये म्हटले आहे की, ते दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मुंबईमध्ये हल्ले करतील आणि त्यासाठी ते आत्मघाती हल्लेखोरांचा वापर करतील.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

दहशतवादी वॉचडॉग फ्लॅशपॉईंटचे संस्थापक इव्हान कोलमन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अल-कायदाने भारताला धमकी देणारा संदेश जारी केला आहे. कोलमन यांनी आपल्या ट्विटमध्ये अल-कायदाचा हवाला देत म्हटले आहे की, ‘ज्यांनी आमच्या पैगंबराचा अपमान केला आहे त्यांना आम्ही ठार मारू. जे आमच्या पैगंबराचा अपमान करण्याचे धाडस करतात त्यांना उडवण्यासाठी आम्ही आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटके जोडू. त्यांना क्षमा किंवा दया मिळणार नाही.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांत 145 पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles