Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्याAkshay Shinde Encounter: हा एन्काऊंटर होऊच शकत नाही,हायकोर्टाने पोलिसांना फटकारले

Akshay Shinde Encounter: हा एन्काऊंटर होऊच शकत नाही,हायकोर्टाने पोलिसांना फटकारले

Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर गंभीर सवाल उपस्थित करत कडक शब्दांत फटकारले आहे. पोलिसांनी आरोपीच्या डोक्यात का गोळी घातली? पोलीस डोक्यात गोळी घालतात कि पायावर? असा प्रश्न करत मुंबई हायकोर्टाने अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आरोपीच्या डोक्यात गोळी का मारली, असा थेट प्रश्न केला आहे. हे सर्व प्रश्न उभे करून कोर्टाने एन्काऊंटरवरच शंका उपस्थित केली.

अक्षय शिंदेच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या कृत्यावर कठोर टिप्पणी केली. या सुनावणी दरम्यान, मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलीस आणि सरकारी वकिलांना कडक शब्दांत फटकारले आहे.

एन्काऊंटरच्या दिवशी 3.30 ते 4 वाजेच्या दरम्यान अक्षयची त्याच्या कुटुंबासोबत संवाद साधला होता. त्यावेळी त्याने आई- वडिलांना ५०० रुपये मागितले. कँटिनमध्ये हवे ते खाण्याची सुविधा मिळावी म्हणून त्याने आईवडिलांकडून पैसे घेतले होते, असं वकील कटारनवरे यांनी कोर्टाला सांगितलं. त्याच्या देहबोलीवरून तो पळून जाण्याचा विचार करत असल्याचे दिसून आले नाही अशी माहिती अक्षय शिंदेच्या वकिलांनी दिली.

यानंतर मुंबई हायकोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले. आरोपीवर नियंत्रण न मिळवता त्याच्यावर गोळी का चालवली?पोलिसांची पिस्तूल अनलॉक का होती? जरी गोळी मारायची होती तर पोलिसांनी डोक्यात गोळी का मारली? पायावर गोळी मारतात का डोक्यात मारतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केला. त्यावर पोलिसांनी कोर्टात सांगितलं कि आम्ही स्व संरक्षणासाठी अक्षय शिंदे वर गोळीबार केला.

यावर कोर्टाने पुन्हा विचारणा केली कि आरोपीने पिस्तूल की रिव्हॉल्वर कशामधून गोळी मारली? त्यावर सरकारी वकिलांनी जे उत्तर दिले ते पटत नसल्याचे कोर्टाने म्हंटल. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कोर्टाला पटत नाहीत, सर्वसाधारण व्यक्ती ही ट्रेनिंग घेतल्याशिवाय पिस्तुल फायर करू शकत नाही, सामान्य व्यक्तीला स्लायडर मागेही खेचता येणार नाही. तुम्ही कधी ते चालवलंय का? असे न्यायालयाने यावेळी म्हटले.

हायकोर्टाने जखमी पोलीस अधिकाऱ्याचे मेडीकल सर्टिफिकेट सादर करण्याचे निर्देश दिले

Akshay Shinde Encounter

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू

धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले

गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज

जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा

पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ

संबंधित लेख

लोकप्रिय