अकोले / डॉली डगळे : कृषी महाविद्यालय, बारामती येथील मयुरी किसन लोहरे या कृषीकन्येने गर्दनी, ता.अकोले. जि. अहमदनगर या गावामध्ये रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण सहभागी मूल्यांकन सादर केले.
रांगोळी द्वारे रेखाटलेल्या नकाशामध्ये गावातील उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्री, वनक्षेत्र, जलस्रोत, पीक लागवड क्षेत्र, कुरण क्षेत्र, फळबाग, मंदिरे आदी घटक दाखवण्यात आले होते.
यावेळी गर्दनी गावचे सरपंच लक्ष्मण दिघे, ग्रामसेवक बाळासाहेब जाधव, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कोरोनाचे सर्व निर्बंध पाळत भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सह्याद्रीच्या कुशीत मिळणाऱ्या पौष्टीक “रानभाज्यांचा मेळावा” हा उपक्रम करण्यात आला व ग्रामस्थांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
या उपक्रमाचे नियोजन कृषीकन्या मयुरी किसन लोहरे हिने केले. व तिला महाविद्यालयाचे प्राचार्य एस.पी.गायकवाड आणि एस.वि.बुरुंगले यांचे मार्गदर्शन लाभले.