राजूर (अकोले) : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आज (दि. १२) रोजी खडकी येथे लसीकरण उत्साहात पार पडले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका श्रीमती एस.जी. सारूक्ते, आशा सेविका नंदा कोंडावळे, आरोग्य कर्मचारी बुधाबाई भांगरे, आशा सेविका अर्चना वळे उपस्थित होते.
पहिल्या लसीकरणा वेळेस लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. लसीकरणाबाबतची भीती व गैरसमज यामुळे लसीकरणास प्रतिसाद मिळाला नव्हता. यावेळी सांदन आदिवासी लोकचळवळीच्या माध्यमातून सकाळी गावांमधून लसीकरण जनजागृती विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्ष अरविंद सगभोर यांनी गावातील तरुणांना लसीकरणाचे महत्त्व सांगितले. लसीकरणासाठी शहरातील लोंढे गावाकडे येतात आणि गावातील माणसे मात्र शेतात निघून जातात. आशावेळी गावातील तरुणांच्या पुढाकाराने लसीविषयी जागृती करण्यात आली. त्यामुळे या दुसऱ्या लसीकरणाच्या वेळेस जास्तीत जास्त लस घेण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला. सचिव किरण बांडे यांनी लसीकरण मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी सांदण आदिवासी लोकचळवळीचे दीपक भांगरे, भारत बांडे, विठ्ठल भालचिम यांनी महत्वाचे योगदान दिले.