Friday, July 12, 2024
Homeग्रामीणअकोले : टिटवी रस्त्याची दुरावस्था

अकोले : टिटवी रस्त्याची दुरावस्था

अकोले : अकोले तालुक्यातील टिटवी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मुख्य रस्त्यापासुन 3 किलोमीटर आत असणारे टिट्वि गाव या रसत्यामुळे इतर गाव व तालुक्याशी जोड़ला गेला आहे. हा रस्ता एकदाच 18 ते 20 वर्षा पूर्वी झाला होता. त्यानंतर आज पर्यंत कोणतीही दुरुस्ती वा काम झाला नव्हता. 

जिल्हा परिषदेअंतर्गत येणारा हा रस्ता लोकप्रतिनिधींनी नेहमी दुर्लक्षित ठेवला आहे, अशी भावना टिटवी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. मुळात अरुंद असलेला हा रस्ता दुतर्फा झाडीमुळे अडचणीचा असतो. रस्त्यावर येणारी झाडी व फांद्या कधीही बांधकाम खात्याने छाटली नाहीत. त्यामुळे चारचाकी दोन वाहने समोरासमोर आल्यावर मोठी अडचणी होत आहे. त्यामुळे किरकोळ अपघात होत असतात.

टिटवी गावच्या सरपंच कविता भांगरे म्हणाल्या, “आमच्या गावाला आजही बस सेवा उपलब्ध नाही. आम्ही खुप प्रयत्न केले, आंदोलन केले. त्यामुळे तात्पुरती बस सुरू झाली. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे व अरुंद रस्त्याचे कारण देत बससेवा बंद करण्यात आल्याचेही भांगरे म्हणाल्या.

पुढे बोलताना भांगरे म्हणाल्या, “जो पर्यंत या रस्ताचे रुंदीकरण होत नाही, तोपर्यंत आमच्या गावात बस देखील येऊ शकत नाही. म्हणून या गंभीर प्रश्नांची शासनाने, लोकप्रतिनिधी यांनी दखल घेऊन तत्काळ रस्त्याच काम करावे अशी मागणी आम्ही ग्रामस्थ करत आहोत.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय