लवकरच आंदोलनाची दिशा ठरणार, मुंबई येथे होणार बैठक
बार्शी, दि. २३ : आयटक संलग्न महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतिने ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या मागण्यासाठी कोल्हापूर येथील सर्कीट हाउस येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना महासंघाचे अध्यक्ष काॅम्रेड तानाजी ठोंबरे व जनरल सेक्रेटरी नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 21 जून 2021 रोजी भेट देण्यात आली.
अधिक माहिती अशी की, ग्रामपंचायत कर्मचारी यांना मिळाणार्या किमान वेतनातील अडथळे दुर करणे, किमान वेतनासाठीची वसूलीची व ग्रामपंचायत उत्पन्नाची अट रद्द करणे तसेच दिनांक 28 एप्रिल 2020 चा शासन निर्णय रद्द करणे या बाबद महासंघाने आग्रही भूमिका मांडली त्यावर या अटी रद्द करण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आश्वासन दिले.
तसेच यावलकर समितीने केलेल्या शिफारशींचा अहवाल स्विकारून ग्रामपंचायत कर्मचार्यांची वेतन निश्चिती करावी या केलेल्या मागणीवर मंत्र्यांनी सध्या कोविड 19 च्या खर्चाच्या परस्थितीत शासन अडकले आहे, असे सांगण्यात आले. परंतु महासंघाकडून या मागणीचा आग्रह धरल्याने या संदर्भात व शंभर टक्के राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्या बाबत लवकरच महासंघाला आमंत्रित केले जाईल व तसेच लेखी पत्र पाठवले जाईल असे आश्वासन दिले.
महासंघाच्या शिष्टमंडळात सखाराम दुरगुडे, काॅम्रेड ए.बी. कुलकर्णी, अॅड, आमेल जाधव, काॅम्रेड नामदेव गावडे, काॅ. शाम चिंचणे, काॅ. बबन पाटील व इतर कार्यकर्ते सहभागी होते.
हि भेट घडवून आणण्यासाठी कोल्हापूर येथील आटकचे नेते काॅम्रेड दिलीप पवार, काॅम्रेड सदाशिव निकम, काॅ. एस.बी. पाटील, काॅ. विक्रम कदम, यांच्यासह गोकूळ दुध कामगार संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले.