Wednesday, April 24, 2024
Homeग्रामीणअहमदनगर : ऑनलाईन शिक्षणापासून सातेवाडी, फोफसंडी गावातील विद्यार्थी वंचित

अहमदनगर : ऑनलाईन शिक्षणापासून सातेवाडी, फोफसंडी गावातील विद्यार्थी वंचित

कोतुळ/यशराज कचरे : ऑनलाईन शिक्षणापासून सातेवाडी, फोफसंडी गावांमधील विद्यार्थी वंचित आहेत.

सरकारने मागील वर्षापासून कोरोनामूळ ऑनलाईन शिक्षण चालू केलं आहे, पण याचा फायदा फक्त नेटवर्क असणाऱ्या ठिकाणच्या मुलांनाच होतो पण आज हि आमचा ग्रामीण दुर्गम आदिवासी भागातील विदयार्थी तुमच्या या डिजिटल ऑनलाईन शिक्षणपासून वंचीत आहे.

आज हि गोरगरीब पालक मोलमजुरी करून हि आपल्या मुलाला, मुलीला शाळेतल्या गुरुजीनी सांगितल्या प्रमाणे अँड्रॉइड मोबाईल पासून दोन हात लांब आहे. या कोरोनाच्या काळात मुलाच्या पोटाला दोन घास खाऊ घालायचे कि मुलाला अँड्रॉइड फोन घेऊन द्यायचा हा प्रश्न सतत डोळ्यासमोर सतावत असतो. अश्यात काही अंशी पालकांनी कर्ज काढून, मोलमजुरी करून, आपल्याला पाल्याला अँड्रॉइड फोन घेऊन दिलेत पण त्याला नेटवर्क नसल्यानं ते एक खेळण्याचं डबडं बनून राहील आहे, जसा पाऊस सुरु झालंय तशी इकडची बिएसएनएल ची असलेली रेंज गायब व्हायला सुरवात होते.

या भागात  8 ते 15 दिवस रेंज नसल्यानं परिसरातील नागरिक, विदयार्थी यांची खूप मोठी गैरसोय होत आहे. परिसरातील नागरिकांनी BSNL ऑफिस ला वारंवार लेखी तसेच तोंडी निवेदन देऊन हि समस्या सोडवली जात नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.

सातेवाडी परिसरात जिओ च टॉवर असून तो चालू नसल्यानं खूप मोठी  गैरसोय असल्याचे समजते. त्यात आधीच रेंज नसल्यानं अन सरकारने ऑनलाईन शिक्षण चालू केल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचणी येतात. ज्यांकडे मोबाईल आहे ते ज्या ठिकाणी डोंगराला, रेंज असेल तिथं जाऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करतात. त्यात पाऊस, व जंगली प्राणी असल्याचा वावर, याला घाबरत जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी बसून राहावं शिक्षण घ्यावे लागत आहे.

मागील आठवड्यात अतिदुर्गम फोफसंडी येथील धर्मवीर आनंद दिघे मिडीयम स्कुल, वीरगाव यथे शिकत असलेल्या तुषार मुठे या लहानग्या विद्यार्थ्यांने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस पत्राद्वारे आपल्या मूलभूत समस्या मांडल्या होत्या.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय