Sunday, July 14, 2024
Homeजिल्हाअहमदनगर : सरपंच कविता भांगरे यांना आदर्श युवा सरपंच पुरस्कार प्रदान !

अहमदनगर : सरपंच कविता भांगरे यांना आदर्श युवा सरपंच पुरस्कार प्रदान !

अहमदनगर : आधार बहुउद्देश्यीय सामाजिक संस्था अहमदनर यांचा आदर्श युवा महिला सरपंच पुरस्कार 2020 – 21 टिटवी ता. अकोले येथील सरपंच कविता भांगरे यांना दि 26 डिसेंबर 2021 रोजी नगर शहरातील रहेमत सुल्तान हॉल या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळत पार पडला. एकूण 14 विभागात विविध पुरस्कार देण्यात आले.

झी, टिव्ही चे दोन अवार्ड विजेते अभिनेते मोहिनीराज गटणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन  सुभेदार नारायण राऊत यांचे हस्ते झाले. तर सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे चे मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. संदिप सांगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘आधार बहुउद्देश्यीय सामाजिक संस्था’ ही एक लहान पण सामाजिक क्षेत्रात काम करणारी बिगर राजकीय संस्था आहे. कोरोना काळात (लॉकडाऊन) विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे प्रस्ताव या पुरस्कारांसाठी मागवण्यात आले होते. त्यात काही माहिती, कामे,  आंदोलने, गावच्या सकारात्मक बातम्या अशी माहिती देण्यात आली होती. आदर्श काम म्हणून नाही तर आदर्श काम करण्यास प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सरपंच कविता भांगरे म्हणाल्या, “कुणीतरी बाहेरून आपल्याला शाबासकीची थाप देत ही देखील समाधानाची व आनंदाची बाब आहे. खरतर गावामुळेच असा पुरस्कार एखाद्याला मिळू शकतो, म्हणून हा पुरस्कार आपल्या गावचा व ग्रामस्थांचा आहे, असे मी मानते व गावच्या वतीने स्वीकारला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विक्रम सलगर, सचिव सुदाम लगड आदीसह मान्यवर उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय