Tuesday, January 14, 2025
HomeNewsस्वस्त घरांच्या योजनांसाठी प्राधिकरण कार्यालयावर आंदोलन

स्वस्त घरांच्या योजनांसाठी प्राधिकरण कार्यालयावर आंदोलन

पाच वर्षांपासुन रखडलेल्या घरांचे वितरण तातडीने  करा – कामगार नेते काशिनाथ नखाते  

पिंपरी : वर्किंग पीपल्स चार्टर कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ तर्फे आज पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या जागांमध्ये श्रमिक कष्टकऱ्यांसाठी स्वस्त घरांच्या योजनेतून २५ हजार घरे निर्माण करा, हॉकर्स झोंन निर्माण करावेत व प्रशासनाच्या चुकीमुळे पाच वर्षांपासुंन रखडलेल्या    पेठ क्रमांक ३० व ३२ येथिल ७९२ घरांचा प्रकल्प तातडीने पुर्ण करुन या घरांसाठी तातडीने अर्ज प्रक्रिया सुरू करून त्याचे वितरण करावे अशा मागण्या करण्यात आल्या.

कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले, यावेळी उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारवकर, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, माध्यम प्रमुख उमेश डोर्ले, मानिषा राऊत, सुनिता पोतदार, अर्चना कांबळे, सुनिता साबळे, संगीता कांबळे, मुमताज शेख, सुवर्णा कांबळे, निरंजन लोखंडे, महादेव गायकवाड, सलीम डांगे, ओमप्रकाश मोरया, सखाराम जाधव आदीसह जिल्हा परिसरातील कामगार उपस्थित होते. 

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य वीरांचे स्मरण करून संकल्प वाचन करुन मागण्यांचे फलक घेउन घोषणा देऊन आंदोलनास सुरुवात झाली.

यावेळी नखाते म्हणाले, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून गेल्या काही वर्षांमध्ये  घरांच्या योजना झालेल्या नाहीत, शहरात श्रमिक कष्टकऱ्यांची संख्या व गरजू लाभार्थ्यांची संख्या पाहता पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक योजना होणे अत्यंत गरजेचे आहे, त्यासाठी विविध पेठांमध्ये घरांची योजना निर्माण करून २५ हजार घरांची निर्मिती करावी त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी छोटे छोटे व्यापार संकुल आणि हॉकर झोंन निर्माण करण्याची मागणी आम्ही वारंवार करत आहोत, पेठ क्रमांक १२ येथे ते ३३१७ घरांची योजना झाली आहे मात्र, ही संख्या अत्यल्प आहे. पुढील कालावधीमध्ये मोठ्या योजना होणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने दर वर्षी हे आंदोलन करण्यात येत आहे यातुन या दोन योजना झाल्या आहेत मात्र पेठ क्र ३० व ३२ येथिल ७९२ सदनिकांच्या गृह प्रकल्पास जाणूनबुजून उशीर केला जात असून याला बिल्डर लॉबीचा विरोध आहे. या विकासकाला वाचवण्याचा प्रयत्न प्राधिकरणाचे अधिकारी करत आहेत, केवळ त्यांना दिवसाला दहा हजार दंड लावला की, लावल्याचे ढोंग करत आहे हाच प्रश्न आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्यांच्यावर ठोस कारवाई केली नसल्यामुळे हा प्रकल्प पाच वर्षांपासून रखडलेला आहे हा तातडीने पूर्ण करून त्यांना ताबडतोब अर्ज प्रक्रिया सुरु करावी तसेच पेठ क्र. सहा येथिल गृह प्रकल्प कार्यान्वित  करून कष्टकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अन्यथा याहीपुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. यांनंतर शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा करमरकर यांना निवेदन देऊन मागण्यावर चर्चा करण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय