Friday, March 14, 2025

शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही – गृहमंत्री वळसे पाटील

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
Photo : Dilip Walse Patil / Facebook

मुंबई, दि. ३१ : शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मांडले.

एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. याविषयी पोलीस विभागाला आदेश देण्यात आले असून मागील दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही गृहमंत्री म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड योग्य मार्ग काढतील. विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी सरकारला आहे. यामध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित  करावे,  असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

हेही वाचा 

ब्रेकिंग : हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी केली अटक

शरद पवार यांनी केली करोनावर मात

Related Articles

- Advertisement -

Latest Articles