Saturday, April 20, 2024
Homeराजकारणउद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज्यपालांनी २४ तासात ‘तो’ निर्णय घेतला मागे

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज्यपालांनी २४ तासात ‘तो’ निर्णय घेतला मागे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तासंघर्ष बघायला मिळत होता. सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरेंच्या या राजीनाम्यानंतर सत्तासंघर्षाच्या या वादावर आता पडदा पडला आहे.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला आज 30 जून गुरूवारी बहुमतची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. या बहुमत चाचणी विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. या बहुमत चाचणीच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. या सोबतच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताच राज्यपालांनी बोलावलेले विशेष अधिवेशनही रद्द करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर विशेष अधिवेशन होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी 11 वाजता हे अधिवेशन होणार सुरू होते.

रात्री उशीरा उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असला तरी उद्धव ठाकरे हे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहे, तशी विनंती केली आहे.

दरम्यान, ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावतील.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय