Wednesday, April 24, 2024
Homeनोकरीभारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याबाबत क्रीडा मंत्र्यांचा महत्वाचा निर्णय

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याबाबत क्रीडा मंत्र्यांचा महत्वाचा निर्णय

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला ऑलिम्पिक विजेत्यांसह दिग्गज खेळाडूंनी पाठिंबा दिल्यानंतर संपूर्ण देशाचं लक्षं आंदोलनाकडे लागलं होतं.

बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपानंतर सात तासांच्या झालेल्या बैठकीनंतर बृषभूषण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. बृजभूषण सिंह यांची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून चार आठवड्यात आपली चौकशी पूर्ण केली जाणार आहे. तोपर्यंत बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवले जाणार आहे. डब्लूएफआय आणि त्याच्या प्रमुखाच्या विरोधातील सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जाईल. अशी माहिती क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत सलग दोन दिवस कुस्तीपटूंची चर्चा सुरू होती. बृजभूषण सिंह यांच्यावर चौकशी समिती स्थापन केल्यानंतर अखेर काल (20 जानेवारी) रात्री उशिरा कुस्तीपटूंनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा :

नागपूर येथील कंटोनमेंट बोर्ड कामठी मध्ये 7 वी पाससाठी नोकरीची संधी, 47600 रूपये पगाराची नोकरी 

पुणे येथे भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत भरती, 30 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

LIC : महाराष्ट्रात भारतीय जीवन विमा महामंडळ अंतर्गत 1942 पदांसाठी भरती

GMC नागपूर अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी भरती, 27 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 5450 जागा

MPSC मेगाभरती : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 8169 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय