Thursday, April 25, 2024
Homeआंतरराष्ट्रीय४०० वर्षांनी बार्बाडोसला मिळाले स्वातंत्र्य, राणीचे राज्य संपुष्टात

४०० वर्षांनी बार्बाडोसला मिळाले स्वातंत्र्य, राणीचे राज्य संपुष्टात

बार्बाडोस : वसाहतवाद संपून बराच काळ लोटला आहे. असे जरी वाटत असेल तरी बार्बाडोस या देशांमध्ये मात्र वसाहत वाद अजूनही अस्तित्वात होता. मागील ४०० वर्षांपासून हा देश वसाहतवादाच्या अस्तित्वाखाली होता. १९६६ साली बार्बाडोसने स्वतःला ब्रिटिशांच्या ३०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करून घेतले होते. परंतु या देशाचे प्रमुखपद मात्र ब्रिटनच्या राणी कडेच राहिले होते.

2005 मध्ये या विरोधात त्रिनिदादमधील कॅरेबियन कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये अपील देखील करण्यात आले होते. त्यानंतर २००८ मध्ये देखील असे अपील करण्यात आले होते. पण अनिश्चित काळासाठी हे अपील पुढे ढकलण्यात आले होते. अखेर सोमवारी मध्यरात्री बार्बाडोस ब्रिटनच्या राणीच्या अमला मधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. आणि बार्बाडोसच्या नागरिकांनी एकच जल्लोष केला आहे.

बार्बाडोस रिपब्लिकन चळवळीचे नेते माया मोडले हे देशाचे पंतप्रधान असतील, तर सँड्रा मसान या देशाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष असतील.

अवघी ३ लाख लोकसंख्या असलेल्या या देशानं गेल्या चार शतकांपासून ब्रिटनशी वसाहतवादाचे संबंध कायम ठेवले होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली होती. ब्रिटनच्या राणीचा अंमल संपुष्टात आल्यामुळे आता बार्बाडोस जागतिक स्तरावर स्वत:च्या जोरावर पुढे जाऊ शकेल, अशी प्रतिक्रिया बार्बाडोसमधील नव्या प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय