Thursday, July 18, 2024
HomeNewsअदार पूनावाला यांनी एलन मस्क यांना दिला 'हा' सल्ला, होतेय जोरदार चर्चा

अदार पूनावाला यांनी एलन मस्क यांना दिला ‘हा’ सल्ला, होतेय जोरदार चर्चा

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्स (सुमारे 3368 अब्ज रुपये) मध्ये ट्विटरची खरेदी करण्याची घोषणा केली होती. आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचे सीईओ आणि मालक अदार पूनावाला यांनी एलन मस्क यांना एक सल्ला दिला आहे. 

आदर पूनावाला यांनी ट्विट केले आहे की,”हाय मस्क, तुम्ही अद्याप ट्विटर खरेदी केले नसेल, तर भारतात टेस्ला कारच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी काही भांडवल गुंतवा. मी तुम्हाला खात्री देतो की, तुम्ही केलेली ही सर्वोत्तम गुंतवणूक असेल.” असे म्हटले आहे.

एप्रिलच्या सुरुवातीलाच मस्कने ट्विटर मधील 9.2 टक्के शेअर्स विकत घेतले. यानंतर कंपनीने त्यांना बोर्डात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर या डीलला अनेक लोकांनी अनावश्यक म्हंटले आहे. असे असताना आता सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी एलन मस्क यांना भारतात टेस्ला कारच्या उत्पादनासाठी काही भांडवल गुंतवण्याचा सल्ला दिला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय