Thursday, January 23, 2025

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा अदानी समूहाकडे

मुंबई : मुंबई विमानतळाचा कारभार गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने हाती घेतला आहे. त्यामुळे आता देशातील चार प्रमुख विमानतळांचा कारभार अदानी समूहाच्या हातात गेला आहे. यापूर्वी लखनऊ, मंगळुरू आणि अहमदाबाद विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाच्या हातात आले होते.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला 50.5 टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, असे या संबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, गौतम अदानी यांनी म्हटले आहे आहे की, मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, तसेच आम्ही हजारो नवीन स्थानिक रोजगार निर्माण करू, असेही अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ही सर्व विमानतळे पुढील 50 वर्षे अदानी समूहाच्या ताब्यात असतील. या काळात या विमानतळांचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि देखभाल अदानी समूहाकडून करण्यात येणार आहे. अदानी समूहाकडून देशातील अधिकाअधिक विमानतळांचा कारभार हाती घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles